ADvt

झरी नगरपंचायत अध्यक्ष पदी शिला चौधरी....



विश्वास नांदेकरांच्या आखाड्यात तयार झालेल्या शिवसैनिकांची राजकीय खेळी ठरली निर्णायक…

झरी नगरपंचायतीवर शिवसेना–भाजपा महायुतीचा झेंडा फडकला...

झरी नगरपंचायत अध्यक्ष पदी शिला चौधरी....

सत्यभाषा न्यूज  :- वणी विधानसभा क्षेत्रातील झरी नगरपंचायतीवर अखेर शिवसेना (शिंदे गट)–भाजप महायुतीने विजयाचा झेंडा फडकविला असून, नगराध्यक्ष पदावर शिला चौधरी यांची निवड झाली आहे. या विजयामुळे झरीत शिवसेनेचा दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
     यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिकांच्या संघटित ताकदीमुळे आणि प्रभावी राजकीय खेळीमुळे हे यश मिळाल्याचे जनमानसात बोलले जात आहे. महायुतीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फलित मानले जात आहे.


     या विजयात सलिमभाऊ खेतानी, यवतमाळ जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख हरिहर लिंगमवार, जिल्हा प्रमुख राजुदास जाधव, चंद्रकांत घुगुल, दिनेश जयस्वाल,  निलेश बेलेकर, आतिश चौहान, बाळु चिडे यांच्यासह अनेक मोठे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, अशी चर्चा रंगत आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर झरीत शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला असून, आगामी काळात अधिक जोमाने संघटनात्मक काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
     दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिला चौधरी यांचे अभिनंदन करताना या विजयासाठी झटलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे युवासेना लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांनी विशेष आभार मानले आहेत.
     झरी नगरपंचायती वरील हा विजय म्हणजे महायुतीच्या एकजुटीचा आणि विश्वास नांदेकरांच्या राजकीय शाळेत तयार झालेल्या शिवसैनिकांच्या ताकदीचा ठळक पुरावा असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments