भाजपा चे प्रभाग क्र. 14 'क' करीता शक्तीप्रदर्शन...
उद्या वणीच्या प्रभाग चौदा मध्ये भव्य प्रचार मिरवणूक....
अर्चना झिलपे यांच्या डोर टू डोअर प्रचाराची...विजयाकडे वाटचाल...
सत्यभाषा न्युज वणी :- वणी नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार प्रचाराची तयारी सुरू असून, प्रभाग क्र. १४-क मधील भाजपाच्या उमेदवार सौ. अर्चना शंकर झिलपे यांच्या प्रचारासाठी उद्या शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ११ वाजता वणी येथील काळाराम मंदिरातून भव्य प्रचार मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीद्वारे भाजपाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनसमर्थन दाखवून देण्यात येणार असून, वणी विधानसभा मतदारसंघातील प्रदेश, जिल्हा व मंडल स्तरावरील सर्व पदाधिकारी, वरिष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, आघाडी, सेल, प्रकोष्ठ, युवा मोर्चाचे पदाधिकारी, तसेच नगर परिषद निवडणुकीतील पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
भाजपाच्या या भव्य मिरवणुकीमुळे प्रभाग क्र. १४-क मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असून, सौ. अर्चना शंकर झिलपे यांच्या डोअर टू डोअर प्रचाराने विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भाजपा वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपा प्रेमीं व जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूक यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.











0 Comments