ADvt

वणीच्या भगवान स्वा मिल ला भीषण आग...आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू :- आगीत अं 30 लाखाचे वर नुकसान...

वणीतील श्री रंगनाथस्वामी परिसरातील घटना..

वणी :- सुरज चाटे

     येथीलच श्री रंगनाथस्वामी चौपाटी परिसरातील भगवान स्वा मिल ला दिनांक 6 च्या मध्यरात्री (7 च्या पहाटे) 1.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. 
     A fire broke out at Bhagwan Swa Mill in Sri Ranganathaswamy Chowpatty area around 1.30 am on 6th midnight (7th morning).


      श्री रंगनाथस्वामी चौपाटी परिसरात भगवान स्वा मिल, रतन भीमजी पटेल अँड सन्स ही अतिशय जुना लाकडाचा टाल होता दरम्यान त्यात फर्निचर, प्लायवूड, ग्लास, लाकडाचे कामे केल्या जात होते. दिनांक 6 च्या मध्यरात्री (7 च्या पहाटे) 1.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली दरम्यान आगेने रुद्र रूप धारण केले. आगीत अंदाजे 30 लाखाच्यावर नुकसान झाल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. ही आग कशाने लागली हे अजुन अस्पष्ट असुन शॉट सर्किट ने आग लागली असावी असा कयास वर्तविण्यात येत आहे. उपस्थितांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
      आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू असुन वृत्त लिहेपर्यंत आग सुरूच होती. 2 अग्निशमन विभागाच्या गाड्या काम करीत असुन अग्निशमन चालक देविदास जाधव, सहायक कर्मचारी न प वणीचे दिपक वाघमारे, सौरभ पाणघाटे, रितेश गौतम, निवृत्त कर्मचारी शाम तांबे, व परिसरातील जनते कडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments