ADvt

हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हिंदूत्व एक जीवनशैली....



हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हिंदूत्व एक जीवनशैली....

वणी :- सुरज चाटे 

      हिंदु हृदसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र साजरी केली जाते. दरम्यान त्यांच्या जयंती निर्मिती दी २३ ला हिंदूत्व एक जीवनशैली या व्याखानाचे आयोजन माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांनी शेतकरी मंदिर वणी येथे केले आहे.
     हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे" यांच्या जयंती निमित्त दि. २३ जानेवारी २०२५ रोज गुरुवारला विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचे "हिंदुत्व एक जिवनशैली" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीहरभाऊ लिंगनवार, शिवसेना संपर्क प्रमुख यवतमाळ जिल्हा, कार्यक्रमाचे उद्घाटक तारेंद्रजी बोर्डे अध्यक्ष : भाजपा यवतमाळ जिल्हा, असुन गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ ला दुपारी २ वा.  शेतकरी मंदिर, वणी येथे संपन्न होणार आहे. 
     त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वास नांदेकर माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र, विक्रांत चचडा व शिवसैनिकानी केले आहे.

Post a Comment

0 Comments