गुरुपौर्णिमा निमित्त भा. ज. पा. वणी शहर च्या वतीने वणी शहरातील गुरुवर्य यांची गुरू पुजा...
अनेक दिग्गजांच्या घरी जाऊन केली गुरुपुजा...
वणी :- सुरज चाटे
गुरू पौर्णिमा हा आपल्या गुरूला पुजण्याचा दिवस असतो. त्यामुळे विविध ठिकाणी गुरू पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र भाजपा वणी शहर कडून एक आगळा वेगळा उपक्रम राबवित शहरातील अनेक गुरुवर्यांची गुरू पुजा करण्यात आली. नुकतेच झालेले भाजपा वणी शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांची एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून गुरुवर्यांचा आशिर्वाद देखिल त्यांच्यासह इतरांनाही मिळाला आहे.
Guru Purnima is a day to worship our Guru. Therefore, Guru Purnima festival is celebrated with great enthusiasm in various places. However, BJP Wani city implemented a unique initiative and Guru Puja was performed at many Guruvaras in the city.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरूवर्याना पूजण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा. रवींद्र चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, देवंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि प्रफुल भाऊ चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्हा, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा यांचे सूचनेनुसार दि. 10 ला गुरुपौर्णिमा निमित्त भारतीय जनता पार्टी वणी शहर च्या वतीने वणी शहरातील गुरुवर्य संस्कृत पंडित स्वानंद पुंड, जैताई माता मंदिर चे सर्वेसर्वा माधव सरपटवार, प्रसिद्ध कीर्तनकार मुन्ना महाराज तुगनायक, योग शिक्षक महादेवराव खाडे सर यांचे घरी जाऊन त्यांची शाल श्रीफळ देऊन गुरु पूजा करण्यात आली. तसेच प्रसिद्ध तबला वादक स्वर्गीय कुचनकार सर यांचे घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ऍड. निलेश माया महादेव चौधरी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वणी शहर, संतोष डंभारे, साखरकर, बालाजी भेढोडकर, हितेन अटारा, मयूर गोयनका आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments