रोटरी क्लब कडून आरोग्य आणि अर्थविश्व क्षेत्रांत अमूल्य योगदान देणाऱ्यांचा सन्मान....
रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी कडून डॉक्टर डे आणि सीए डे साजरा.......
रोटरी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल व सचिव गौरव जोबनपुत्रा यांनी केला डॉक्टर व सीए चा सन्मान....
वणी :- सुरज चाटे
रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी, वणीच्या वतीने डॉक्टर डे आणि सीए डे उत्साहात साजरे करण्यात आले. या विशेष दिवशी क्लबच्या सदस्यांनी वणीतील नामवंत डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्स यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मोमेंटो देत त्यांचा सन्मान केला.
Rotary Club Black Diamond City, Wani celebrated Doctor's Day and CA Day with enthusiasm. On this special day, the club members met renowned doctors and chartered accountants of Wani in person and honored them by presenting them with mementos.
या सन्मान कार्यक्रमात रोटरी क्लब वणी चे अध्यक्ष लवलेश लाल, सचिव गौरव जोबनपुत्रा व इतर सदस्यांनी सक्रीय सहभाग घेतला. “डॉक्टर आणि सीए हे समाजाचे खंबीर आधार आहेत. आरोग्य आणि अर्थविश्व या दोन्ही क्षेत्रांत त्यांचे योगदान अमूल्य आहे, असे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे समाजातील या दोन्ही क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. रोटरी क्लबच्या वतीने दिलेले मोमेंटो हे त्यांच्या कार्याची दखल घेणारे आणि प्रेरणादायी ठरले.
0 Comments