ADvt

झरी तालुक्यातून वाहून गेलेला शेतकरी आढळला वणी तालुक्यात....



झरी तालुक्यातून वाहून गेलेला शेतकरी आढळला वणी तालुक्यात....

दोन दिवस सुरू होती शोध मोहीम :- धानोरा येथील नाल्यावरून गेला होता वाहून....

वणी :- सुरज चाटे 


     शेतकरी दिवसागणिक संकटात दिसुन येत असुन झरी तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी नामे सतीश शमुवेल दूर्लावार (३६) शेतीची कामे आटपून घरी येताना नाल्याला आलेल्या पुरात युवा शेतकरी सतीश हा वाहून गेला. ही घटना बुधवार दी. ९ जुलै दू. ४ वाजताचे सुमारास घडली. घटनेनंतर तालुका प्रशासनाकडून शोधमोहीम राबविण्यात आली मात्र तो मिळून आला नाही अखेर दोन दिवसाच्या नंतर दि. 11 ला. चक्क वणी तालुक्यातील चिखली परामडोह नदिकाठावर त्याचा मृतदेह आढळून आला. 
     Farmers are in trouble day by day. Satish Samuel Durlawar (36), a farmer from Dhanora in Jhari taluka, was swept away in a flood that broke out in a drain while returning home after completing his agricultural work. The incident took place on Wednesday, July 9, at around 4 pm. After the incident, a search operation was launched by the taluka administration, but he was not found. Finally, after two days, on the 11th, his body was found on the banks of the Chikhli Paramadoh river in Wani taluka.
     मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले ओसंडून वाहत होते. तर काही नाल्यांना पूर आला होता. झरी तालुक्यातील धानोरा येथील सतीश शमुवेल दूर्लावार (३६) यांची शेती आहे. दि. ९ ला सकाळच्या सुमारास ते शेतात गेले घरी परत येताना धानोरा नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, पोलीस विभाग, पोलिस पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी शोध घेत होते मात्र तो मिळून आला नाही. अखेर नदीचे पाणी उतरले आणि त्याचा मृतदेह शिरपूर पोलिस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या चिखली परामडोह नदिकाठावर आढळून आला. 
    माहिती मिळताच पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला. सतीश च्या मागे दोन मुली असून त्यांच्या मागे एक भाऊ, आई, वडील व पत्नी असा आप्त परीवार आहे. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments