ADvt

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्रावणमासानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.



श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्रावणमासानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...

भगवान श्रीकृष्णाची पालखी व शोभायात्रा विशेष आकर्षण...

वणी :- सुरज चाटे

शहराचे आराध्यदैवत श्री रंगनाथ स्वामी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     Various religious programs have been organized at the city's revered deity, Shri Ranganatha Swamy Temple.
      दि. २६,२७ व २८ जुलै ला ज्ञानेश्वरी या विषयावर ह.भ.प. बबन महाराज कोंडोलीकर यांचे अमृतमय वाणीतुन संगीतमय प्रवचन दररोज दुपारी ३ ते ६ या वेळी होणार आहे. दि. १ ऑगस्ट ला दुपारी ४ ते ६ या वेळी दुर्गा सप्तशती पाठ प्रस्तुत्कर्ता - जगदंबा महिला मंडळ वणी, दि. २. ऑगस्ट महासंत श्री जगन्नाथ बाबा उपासना, रात्री ७ ते ९, दि. ४ ऑगस्ट संगीतमय सुंदर कांड दु. ३ ते ६ महिला मंडळ पांढरकवडा द्वारा, दि. ७ ऑगस्ट ला. रात्री ७ ते ८ महासंत श्री गजानन महाराज शेगाव उपासना, दि. ११ ऑगस्ट ला. दू. ३ ते ६ ह.भ.प.मनुमहाराज तुगनायत व संच यांचा श्री विष्णू सहस्त्र नामावली पठन व भक्ती संगीताचा कार्यक्रम, १६ ऑगस्ट ला दु. ५ ते ७ श्री रामधून परिवार वणी तर्फे रामधुन. १५ ऑगस्ट ला श्री रंगनाथ स्वामी सेवा समितीच्या वतीने  "श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे रात्री ९ ते १२ संगीतमय प्रवचन व त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.


     दिनांक १६ ऑगस्ट ला सकाळी ९ ते १२ या वेळी भगवान श्रीकृष्णाची पालखी व शोभायात्रा, १२ ते १ दहीहंडी व गोपाळकाला, दुपारी १ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
     दि. १८. ला. दु. ४ ते ६ हभप प्रशांत महाराज भोयर यांचे काल्याचे कीर्तन. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments