शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ व्यक्तिमत्व जगाच्या पडद्या आड.....
दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन....
वणी :- सुरज चाटे
दिवसागणिक अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असुन वरोरा चिमूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वणी येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले समाजसेवी व्यक्तिमत्व व नगर परिषद शाळा क्रमांक ८ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिलीप नारायण कोरपेनवार (५७) रा. रविनगर यांचा दि. २० ला पहाटे च्या दरम्यान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
The number of accidents is increasing day by day and in a terrible accident on Warora Chimur road, Dilip Narayan Korpenwar (57), resident of Ravinagar, a leading social worker and headmaster of Nagar Parishad School No. 8 in Wani, died in an accident on the morning of the 20th.
ते चिमूर येथे मालवाहू पिकअपने काही कामानिमित्त जात असतांना तळोदी शिवारात भरधाव टँकरने पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीप कोरपेनवार यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना लगेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ही घटना २० जुलैला पहाटे च्या दरम्यान घडली.
त्यांनी अनेक विकास कामात हातभार लावलेला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असे नावलौकिक त्यांचे होते. त्यांनी वृक्ष रोपण व अनेक विविध उपक्रम वणीच्या विकासाकरिता राबविले आहे. असे होतकरू नेतृत्व जगाच्या पडद्या आड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments