ADvt

रोटरी क्लब वणीची नवीन कार्यकारिणी जाहीर...



रोटरी क्लब वणीची नवीन कार्यकारिणी जाहीर...

अध्यक्ष पदी लवलेश लाल तर सचिव गौरव जोबनपुत्रा...

वणी :- सुरज चाटे 

     रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीचा पदग्रहण सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात क्लबचे माजी अध्यक्ष परेश पटेल आणि सचिव धवन अग्रवाल यांनी आपल्या पदाचा कार्यभार नवीन अध्यक्ष लवलेश लाल आणि सचिव गौरव जोबनपुत्रा यांच्याकडे सोपवला.
     The inauguration ceremony of Rotary Club of Black Diamond City, Wani was held in a very enthusiastic atmosphere today. In this program, the former president of the club, Paresh Patel and secretary, Dhawan Agarwal, handed over the charge of their posts to the new president, Lovelesh Lal, and secretary, Gaurav Jobanputra.
     या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महेशजी मोकलकर, शब्बीरजी शाकीर, आमदार संजयजी देरकर, माजी आमदार संजीवरेड्डीजी
बोदकुरवार, अंकुशजी जयस्वाल ,श्रीमती कमलेशजी लाल आणि कैलाशजी उदावंत हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले.
     या कार्यक्रमात एकूण ५५ सभासदांनी नवीन पदभार स्वीकारत रोटरी क्लबच्या कार्यक्षमतेचा आणि संघटनेच्या व्यापक सहभागाचा प्रत्यय दिला.या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत वणी शहरच्या विविध शाळा च्य समोर रोड वर *सूचना फलक* लावण्याचा कार्यक्रम चा उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली व परिश्रमपूर्वक नियोजन केले. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी सामाजिक कार्याच्या दिशेने आणखी प्रभावी पावले टाकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments