ADvt

कायर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था.....

कायर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था.....

मनसेचा आक्रमक पवित्रा :- तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

वणी :- सुरज चाटे

        तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता, वैद्यकीय उपकरणांचा आणि औषधांचा अभाव यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी याबाबत  तालुका आरोग्य अधिकारी, वणी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कायर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना उपचारासाठी वणी किंवा इतर ठिकाणी जावे लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. अनेकदा गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

    या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी मनसेने केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यात यावीत, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा आणि केंद्राची आरोग्य व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

       निवेदन देताना राकेश शंकावार, विनोद कुचणकर, कैलास निखाडे, आशिष ठावरी, चेतन कुचणकर, अतुल काकडे, सागर बोथले, प्रवीण कळसकर, अंनता आगलावे, संदीप गुरनुले, अजय शेंडे, प्रीतम बदकल, प्रदीप वाढई, सतीश मोहितकार, सारंग बोथले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

Post a Comment

0 Comments