ADvt

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवाड्या चे आयोजन.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवाड्या चे आयोजन....

भारताचे देश गौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिना निमित्त भाजपा चा स्तुत्य उपक्रम....

वणी :- सुरज चाटे

      भारताचे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधुन त्यांचे जन्म दिवसापासुन तर राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांचे जयंती पर्यंत भाजपा वणी विधानसभा द्वारा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवाडा' दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत साजरा केल्या जाणार आहे. यामध्ये विविध समजुपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

     On the occasion of the birth anniversary of India's national pride Prime Minister Narendra Modi, from his birth anniversary to the birth anniversary of the Father of the Nation Mahatma Gandhi, the BJP Vani Vidhan Sabha will celebrate the 'Seva Pandharwada' from the leader to the father of the nation from 17 September 2025 to 02 October 2025. Various useful activities will be implemented in this.

     यात दी. १७ ला महाआरोग्य शिबीर, सदर शिबीरामध्ये लता मंगेशकर हॉस्पीटल नागपुर येथील हृदयरोगतज्ञ, दंतरोगतज्ञ, स्त्रिीरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, त्वचारोगतज्ञ, कार्डी ओधोरसिक इत्यादी क्षेत्रातील डॉक्टरांचा सहभाग होणार असुन, बाजोरिया लॉन वरोरा रोड वणी सकाळी ९:०० ते सायं. ५:०० पर्यंत होणार आहे. दि. 20 नमो नेत्रसंजीवनी शिबीर सदर शिबीरामध्ये सेवाग्राम येथील तज्ज्ञ  डॉक्टरांकडुन नेत्र तपासणी केल्या जाईल, जैताई मंदिर वणी स. ९:०० ते दू. ३:०० पर्यंत होणार आहे. दि. 21 ला स्वच्छता अभियान यामध्ये सार्वजनिक ठिकाण, ग्रामपंचायत परिसर, शाळा व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहिम ठिक ठिकाणी राबविल्या जाईल, स्वच्छता अभियान यामध्ये सार्वजनिक ठिकाण, ग्रामपंचायत परिसर, शाळा व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहिम ठिक ठिकाणी राबविल्या जाणार आहे. दि. 22 ते 01 ऑक्टोबर आयुष्यमान भारत कार्ड अभियान यामध्ये वणी शहरातील १४ प्रभागामधील प्रमुख एका दुर्गादेवी मंडळा जवळ भाजपा वणी शहर मंडळ द्वारा सायं ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत निशुल्क आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे. दि. 25 सप्टेंबर ला. पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथवर पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती सा. 9 वाजता साजरी केल्या जाईल.  दि. 25 ला एक पेड माँ के नाम अभियान यामध्ये सार्वजनिक ठिकाणी तथा महत्वाच्या शाळा व शासकीय कार्यालय येथे आईच्या नावाने एक झाड लावण्याची मोहिम स. 10 वाजता राबविन्यात येणार आहे. दि. 25 ला कार्यकर्ता मेळावा तसेच वोकल फॉर लोकल अभियान यामध्ये वणी शहरात व वोकल फॉर लोकलचा प्रचार व प्रसार सुरू करण्यात येणार आहे.  दि. 02 ला स्वच्छता अभियान, राष्ट्र‌पिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती यामध्ये राष्ट्र‌पिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात येणार असुन तसेच सेवा पंधरवाडा समारोप कार्यक्रम, भा. ज. पा. संपर्क कार्यालय, बस स्टॅन्डसमोर घेण्यात येणार आहे. तरी होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन दि. 15 ला शासकीय विश्राम गृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा पदाधिकारी यांनी केले आहे. 

    यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, ऍड. निलेश चौधरी, कुणाल चोरडिया, संतोष डंभारे, पवन एकरे, महादेव खाडे, बालाजी भेदोडकर, हेमंत गौरकार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments