भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी लवलेश लाल यांची निवड....
पक्षाने दिली नवीन मोठी जबाबदारी :- विविध कार्याची दखल घेत दिली कामाची पावती...
वणीः - सुरज चाटे
विविध सामाजिक क्षेत्रात तसेच व्यापारी क्षेत्रातील दांडगे अनुभवी नेतृत्व असलेले तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासू लवलेश किशनलाल लाल यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना आणखी एक नवी मोठी जबाबदारी सोपवली आहे. नुकतीच त्यांची भाजपा व्यापारी आघाडीच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाने त्यांना वणी शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दोन वेळा दिली होती ते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
Taking note of the work of Lovelesh Kishanlal Lal, who is a seasoned leader in various social and business sectors and a scholar in various fields, the party has given him a receipt for his work and entrusted him with another big new responsibility. He has recently been elected as the Yavatmal District Vice President of the BJP Traders' Alliance. Earlier, the party had given him the responsibility of the President of the Wani City Traders' Alliance twice, which he had duly fulfilled. This appointment has been made on the orders of BJP District President Praful Chavan.
विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लवलेश किशणलाल लाल हे समाजसेवा तसेच रोटरी क्लब मार्फत देखील त्यांची सेवा सुरू असतेच तसेच उत्कृष्ठ व्यापारी म्हणुन सुद्धा त्यांना ओळखले जाते व्यापारी क्षेत्रात त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी अनेकदा व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
पक्षाने दाखवलेला विश्वास हा अभिमानास्पद असुन हा विश्वास सार्थ करण्यासाठी मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम करणार, शेतकरी, कामगार, युवक, व्यापारी सर्वसामान्य मतदारांशी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांचे सहकार्याने प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि पक्षाची ताकद वाढवणे हा माझा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान राजु पडगीलवार, राजु गुंदेचा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments