ADvt

भाजपा वणी शहर कडून आयुष्यमान भारत कार्ड अभियान....



भाजपा वणी शहर कडून आयुष्यमान भारत कार्ड अभियान....

तुमचं आयुष्यमान भारत कार्ड आहे का....फायदे काय... काढायचं कस जाणुन घ्या..

वणी :- सुरज चाटे

   भारताचे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधुन त्यांचे जन्म दिवसापासुन तर राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांचे जयंती पर्यंत भाजपा वणी विधानसभा द्वारा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवाडा' दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत साजरा केल्या जाणार आहे.  त्यात विविध समजुपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
     Under the Ayushman Bharat Card Campaign, free Ayushman Bharat cards will be distributed by the BJP's Vani City Mandal from 6:00 PM to 8:00 PM near Durgadevi Mandal, one of the major wards in Vani city.
     आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री जनआरोग्य योजना हा भारत सरकारचा आरोग्य विमा योजना आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचे अनेक फायदे मिळतात. त्याच अनुषंगाने आयुष्यमान भारत कार्ड अभियान यामध्ये भाजपा कडून वणी शहरातील १४ प्रभागामधील प्रमुख एका दुर्गादेवी मंडळा जवळ भाजपा वणी शहर मंडळ द्वारा सायं ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत निशुल्क आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे. 
     भारतीय जनता पार्टी वणी शहर द्वारा आयोजित आयुष्यमान भारत कार्ड अभियान दि. 23 सप्टेंबर 2025 ते 01 ऑक्टोबर 2025 पर्यंत वणी शहरातील चौदाही प्रभागात प्रमुख दुर्गा उत्सव मंडळा मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ज्या मंडळा ला सदर अभियान घ्यायचे आहे त्यांनी राजू गव्हाणे 9764253253, दिपक पाऊणकर 8668825689, बालाजी भेदोडकर 9545456970 यांना संपर्क साधावे असे आवाहन भाजपा वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी व संपूर्ण आयोजक समितीने केले आहे. 


     आयुष्यमान भारत कार्डचे फायदे
१) मोफत उपचार सुविधा 
      ५ लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक आरोग्य विमा कवच. सरकारी तसेच नोंदणीकृत खासगी रुग्णालयात मोफत उपचार.

२) रुग्णालयीन खर्च वाचतो 
      दाखल होण्यापूर्वी ३ दिवसांचे व दाखल झाल्यानंतर १५ दिवसांचे खर्च कव्हर, शस्त्रक्रिया, आय सी यु, औषधे, चाचण्या यांचा खर्च यामध्ये समाविष्ट.
 
३) कुटुंबासाठी एकच कार्ड
     कुटुंबातील सदस्यसंख्येवर मर्यादा नाही, संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित ५ लाख रुपयांपर्यंत कवच.
 
४) नगदी रहित (कॅश लेस) उपचार
  कार्ड दाखवून थेट उपचार मिळतो, रुग्णालयाला थेट पेमेंट सरकारकडून केले जाते.
 
५) वयोमर्यादा नाही
   मुलं, प्रौढ, वृद्ध – सर्वांना कव्हर.
 
६) राष्ट्रव्यापी सुविधा
   भारतभर कुठल्याही पॅनेल रुग्णालयात कार्ड वापरता येते.
 
७) महागड्या आजारांवर उपचार
   कॅन्सर, हृदयविकार, किडनी ट्रान्सप्लांट, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया इत्यादी साठीही लाभ मिळतो.
 
८) ऑनलाइन सोय
  लाभार्थींची माहिती, हॉस्पिटल लिस्ट व क्लेम स्टेटस ऑनलाइन पाहता येते.

यासाठी लागणारी कागदपत्रे
१) आधार कार्ड (अनिवार्य)
२) राशन कार्ड
३)अर्जदाराचा स्वतःचा नंबर आधार ला लिंक असलेला 
    (OTP साठी आवश्यक)

Post a Comment

0 Comments