शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना (उ. बा. ठा) चे डफळे आंदोलन...
सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तहसीलवर धडकणार सेनेच भगव वादळ.....
वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक असुन, यवतमाळ जिल्ह्यातील भीषण अतिवृष्टी, वारंवार होत असलेली पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे महायुती सरकारने यवतमाळ कडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी मंगळवार दि. २३ ला खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात डफडे आंदोलन करण्यात येणार आहे.
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) is aggressive for the rights of farmers in Wani taluka, but the Mahayuti government seems to have ignored the serious issues of heavy rains, frequent crop destruction and farmer suicides in Yavatmal district. To wake up the government from its slumber, a protest will be held on Tuesday, 23rd under the guidance of MP Sanjay Deshmukh, MLA Sanjay Dekar and under the leadership of District Chief Sanjay Nikhade.
मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता वणी तहसील कार्यालयावर शिवसेना (उबाठा) डफडे आंदोलन करणार आहे. आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहिर करावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या महत्वपूर्ण मागण्याचा समावेश आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनामुळे महायुती सरकारची खोटी आश्वासने आणि निष्क्रियता उघडकीस येणार आहे. तरी महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलना करीता एकत्रित यावे असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच... हे आंदोलन...संजय निखाडे.....
राज्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर , हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत जी आर काढला मात्र यवतमाळ जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली असुन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन असल्याचे यावेळी संजय निखाडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख यांनी बोलून दाखविले.
0 Comments