ADvt

वणीत मनसेच्या वतीने भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन...



वणीत मनसेच्या वतीने भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन....

आकर्षक बक्षिसांची लुट...

तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम टप्पू सेना व  मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची विशेष उपस्थिती..

वणी :- सुरज चाटे

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी येथे दि. २२ सप्टेबर पासून भव्य गरबा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

     A grand Garba festival will be inaugurated in Wani from September 22, as per the concept of Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar. This competition, organized on the occasion of Navratri festival, has created an atmosphere of excitement.

     स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील टप्पू सेनेचे कलाकार उपस्थित राहणार आहेत, जे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरनार आहे. या गरबा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आयोजकांनी विविध मौल्यवान बक्षिसे ठेवली आहेत. या बक्षिसांचे वितरण वयोगटानुसार केले जाणार आहे, अशी माहिती आयोजक मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे. 

        वयोगटानुसार आकर्षक बक्षिसे
११ ते ३० वर्षे वयोगट

    या गटातील विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस म्हणून दुचाकी गाडी, द्वितीय बक्षीस टीव्ही, तृतीय फ्रिज, चतुर्थ वॉशिंग मशीन, पाचवा लॅपटॉप, सहावा टॅब, सातवा मोबाईल, तर अनुक्रमे सायकल, होम थिएटर आणि पैठणी साडी अशी बक्षिसे आहेत.

३१ वर्षांवरील वयोगट

     या गटातील स्पर्धकांसाठी सोन्याची नथ, ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, पैठणी साडी आणि ज्युसर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

५ ते १० वर्षे वयोगटातील बालस्पर्धक  

    लहान मुलांसाठी सायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    या स्पर्धेत सुमारे १,००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गरबा स्पर्धा दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, गरबा महोत्सव समिती अध्यक्ष साहिल सलाट, तसेच वैभव पुराणकर, जतीन राऊत, लक्की सोमकुंवर, संस्कार तेलतुंबडे, गौरव पुराणकर, तालिब खान, योगेश तुराणकर, आशिष घनकसार, सतिश ठोंबरे, सचिन कुडमेते, कृष्णा कुकडेजा यांच्यासह शहरातील सर्व मनसे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

    या महोत्सवामुळे वणी शहरातील नवरात्र उत्सवाला एक वेगळीच रंगत येणार असून, या आयोजनाचा समस्त जनतेने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments