ADvt

मागणी मान्य न झाल्याने आर सी सी पी एल विरोधात आमरन उपोषण सुरू...



मागणी मान्य न झाल्याने आर सी सी पी एल विरोधात आमरण उपोषण सुरू...

अपघातग्रस्त कामगाराला नुकसान भरपाई व दिव्यांग विधवांना सी एस आर सुविधांची मागणी...

वणी :- सुरज चाटे 

     आरसीसीपीएल एमपी बिरला मुकुटबन कंपनी विरोधात स्थानिक शेतकरी, कामगार व गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात एक स्मरणपत्र कंपनी प्रशासनाला सादर करण्यात आले होते त्यामध्ये स्पष्ट मागण्या मांडण्यात आल्या होत्या.
    As the demands were ignored, a fast unto death has been started in front of the company gate from September 22, 2025.
    या स्मरणपत्रात अपघातग्रस्त कामगार सागर इंगोले यांना तातडीने अपघाती नुकसान भरपाई देणे, मुकुटबन, अडेगाव, अर्धवण, पिंप्रडवाडी, बैलमपूर, राजूरगोटा, वेडसी या गावांमधील दिव्यांग व विधवा महिलांना सी एस आर अॅक्टिव्हिटी अंतर्गत पायाभूत सुविधा व साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच शेतकरी व भूमिपुत्रांना कंपनीमध्ये एन ए पी एल पे रोल वर कायमस्वरूपी नोकरीत घेणे यांसह आदी महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.
   मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दि. 22 सप्टेंबर 2025 पासून कंपनी गेटसमोर आमरण उपोषनाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न केल्यास कंपनी गेट बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments