ADvt

काळोख्या अंधारात गो.. माता दिसत नाही अन घडतो अपघात....



काळोख्या अंधारात गो.. माता दिसत नाही अन घडतो अपघात....

अपघातापासून बचावाकरिता बांधले.. रेडियम वर्धित कॉलर बेल्ट....

वणी येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचा  स्तुत्य उपक्रम...

वणी :- सुरज चाटे 

     महामार्गावर व भटकंती करीत फिरणाऱ्या गायी काळोख्या अंधारात दूरवरून दिसत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान मुक्या जनावराला वेदना सहन करावी लागत होती. दरम्यान या बाबीचा विचार करून वणी येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचे अध्यक्ष लवलेश लाल व क्लबचे सर्व सदस्य यांच्या मार्फत रेडियम-वर्धित कॉलर बेल्ट बसविण्यात आले. 
     The number of accidents had increased as cows roaming on the highway and wandering around were not visible from a distance in the pitch darkness. Meanwhile, the mute animal had to endure pain. Meanwhile, considering this matter, radium-enhanced collar belts were installed by the President of the Rotary Club of Black Diamond City in Wani, Lovelesh Lal, and all the members of the club.
      नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, वणी येथील रोटरी क्लबने शहरात आणि महामार्गांवर फिरणाऱ्या १०० हून अधिक गायींना रेडियम-वर्धित कॉलर बेल्ट बसवले. या उपक्रमाला बजरंग दलाच्या वणी येथील सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळाला.
     क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश भटक्या गायींशी टक्कर झाल्यामुळे होणारे अपघात रोखणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे.
    प्रकल्प संचालक मयूर गेडाम यांनी बजरंग दलाचे सदस्य विशाल दुधबडे, संतोष लक्षशेट्टीवार आणि त्यांच्या टीमसह वणी येथे फिरून गायींना कॉलर बेल्ट बसवले.

Post a Comment

0 Comments