ADvt

काय दिलं विधानसभेला माजी आमदारांनी?.….



काय दिलं विधानसभेला माजी आमदारांनी?.….

आमदारकीची दोन टर्म :- १० वर्षाची कारकीर्द....

विशेष लेख - सुरज चाटे 

    वणी विधानसभेच्या इतिहासात बरेच आमदार होऊन गेले...जनतेच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी मोठी पदं लागत नाहीत, लागते ती प्रामाणिकता आणि काम करण्याची तळमळ.   

    साध्या कुटुंबातून आलेले, शेतकरी जीवनाशी नाळ जुळलेले आणि जनतेशी घट्ट नातं असलेले संजीवरेड्डी बोदकुरवार जेव्हा पहिल्यांदा २०१४ ला आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा ते शेतात होते आणि निकाल आला की ते आमदार झाले. त्यावेळीच लोकांनी अनुभवलं... हा आमदार आपल्यातलाच. मग त्यांनी विधानसभेला काय दिलं?... हा प्रश्न भोवतो आहे... 
      आमदारकीची कारकीर्द, २०१४ ते २०२४ दहा वर्षांच्या आमदारकीत त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. पहिल्या टर्म मध्ये २०१४ ते २०१९ मध्ये त्यांनी  ६५७ कोटी रुपयांच्या वर निधी जनते करीता आणला, २०१९ ते २०२४ मध्ये १०२९ कोटी तर इतर विविध फंडातून २७० कोटीच्या वर निधी आणला यात रस्ते, पाणी पुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांच्या इतर कामांना प्राधान्य देत आदी विविध विकास कामे कसे पूर्ण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. त्यांच्या कारकिर्दीत २००० कोटी हून अधिक निधी त्यांनी खेचून विधानसभेच्या विकासाकरिता आणला. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.


    साधी राहणी – उच्च विचार, सत्ता असताना किंवा आजही, संजिवरेड्डी बोदकुरवार यांचा साधेपणा कायम आहे. गाड्या, ताफे, दिखावा यापेक्षा ते थेट लोकांशी भेटणं पसंत करतात. लोकांच्या अडचणी ऐकणं, तातडीने उपाय शोधणं हा स्वभाव.
     समाजसेवेची तळमळ, आमदारकी संपली तरी समाजकार्य थांबलं नाही. आजही गावागावात फिरून ते जनतेच्या व्यथा जाणून घेतात, तरुणांना प्रेरणा देतात आणि विकासासाठी मार्गदर्शन करतात.
       आमदार - खासदार कित्येक येतात आणि जातात मात्र जनते प्रती असलेली आपुलकी, लोकांना समजण्याची कला, जुळलेली नाळ, आणि विश्वास यांवरच संपूर्ण राजनीतीचा व सामाजिकतेचा पाया असतो... मात्र राजकारण किती करावे आणि समाजकारण किती?.. हे ज्यांना समजले ते खरे राजकारणी... हे सर्व गुण संपन्नतेची सावली विधानसभेचे लाडके माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर पडली असल्याचे दिसते. ते मात्र जनतेच्या मनात....समोर येणार.... 



    आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देताना, लोकांच्या मनात विचार उमटतो......

    आज जरी ते आमदार नसले तरी “काय दिलं विधानसभेला माजी आमदारांनी?.... तर साधेपणा, प्रामाणिकता, विकासात्मक दृष्टिकोन आणि खरंखुरं जनसेवेचं राजकारण!”..... अशीच चर्चा जनतेत ऐकावयास मिळत आहे. 

🎉🎊  संजिवरेड्डी बोदकुरवार साहेब, माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र.. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊

Post a Comment

0 Comments