वेकोली फक्त नफा मिळवण्यासाठीच का?.. जनतेकडे लक्ष कोण देणार...दिपक मत्ते
वेकोली च्या विविध समस्यां विरोधात दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात रस्ता रोको.....
वणी :- सुरज चाटे
वे.को.ली. उकणी वणी नार्थ निर्मित अनेक समस्याना नागरिक समोर जात आहे. अनेक समस्या असताना वेकोली प्रशासन मात्र आपला नफा कमविण्यातच व्यस्त असुन त्यांना जनतेचे काही देणे घेणे नसल्याचेच दिसत आहे. विविध मागण्यांचे निराकरण न झाल्याने अखेर आपल्या मागण्यांच्या निराकरणासाठी वे को ली विरोधात दिपक मत्ते, सरपंच, पिंपळगाव यांच्या नेतृत्वात संपूर्ण समस्या ग्रस्त नागरिकानी दि. ०९ ला. स. ७ वाजतापासुन जुनाड फाटा येथे रस्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
As various demands were not resolved, finally, to resolve their demands, the entire problem-ridden citizens, led by Deepak Matte, Sarpanch, Pimpalgaon, have taken up the weapon of road blockade at Junad Phata from 7 am on 09th.
पिंपळगाव परिसरात वेकोलीमुळे निर्माण झालेल्या धूळ, प्रदूषण शेत पिक नुकसान भरपाई, आरोग्य दुष्परिणाम, रस्त्यालगत काटेरी झुळूप, खान परिसरात काटेरी झुडपामुळे जंगली प्राणी बाबत उपाययोजना, जुनाड फाटा ते उकणी परावर्तित रस्ता केला परंतु ग्रामस्थांसाठी स्वतंत्र समांतर रस्ता बांधकाम अजून केले नाही, गावालगत डम्पिंग मुळे ग्रामस्थांना धोका आहे, उर्वरित जमीन संपादित करणे, धूळ, प्रदूषण मुळे रात्रीच्या प्रवास करिता रस्त्यालगत विद्युत दिवे लावणे याबाबत आमचे कडून व प्रशासनाच्या वतीने न्याय मागणी पत्र व्यवहार केला याबाबत यापूर्वी ७ मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊनहि वेकोली प्रशासन सदर समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आरोप निवेदनातून केला आहे.
वेकोली खाणीसाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांवर वेकोली प्रशासन बेजबाबदारपणे अन्याय करीत आहेत. पिंपळगाव, उकणी, बोरगांव, जुनाड, निळापुर ब्राम्हणी, कोलार, पिपरी येथील नागरिकांना वेकोलीच्या धूळ, प्रदूषण, आरोग्य, नादुरुस्त रस्ते, धोकादायक ओ बी डम्पिंग व उर्वरित जमीन संपादन या समस्येकडे आपण दुर्लक्ष करीत आहे. उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे दि. ०१ रोजी बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. वेकोली वणी नॉर्थ मार्फत निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण होत नसल्याने नाईलाजाने न्याय व रास्त मागण्यासाठी दि. ०९ ला सकाळी ७ वाजता जुनाड फाटा, येथे समस्याचे निराकरण होईपर्यंत पिंपळगाव व परिसरातील समस्याग्रस्त नागरिकांसह पिंपळगाव चे सरपंच दिपक मत्ते यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान होणाऱ्या परिस्थितीस वे को ली प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा दि. ०३ रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
0 Comments