ADvt

आयुष्यमान भारत कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद....



आयुष्यमान भारत कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद....

२२ दुर्गा मंडळात १०२३ आयुष्यमान भारत कार्ड....

वणी :- सुरज चाटे 

    भा. ज. पा. वणी शहर मंडळ व्दारा नवरात्रीच्या पावन पर्वावर वणी शहरातील १४ प्रभागामधील प्रमुख दुर्गादेवी मंडळात दि. २३ ते ०१ ऑक्टोबर पर्यंत 'निशूल्क आयुष्यमान भारत कार्ड अभियान' आयोजीत करण्यात आलेले असुन सदर अभियानात दि. २८ पर्यंत वणीच्या २२ दुर्गा मंडळात १०२३ आयुष्यमान भारत कार्ड व ९१ आभा कार्ड काढण्यात आले आहे.


     B. J. Pa. Vani City Mandal has organized a 'Free Ayushman Bharat Card Campaign' from 23rd to 01st October in the main Durga Devi Mandals of 14 wards of Vani city on the auspicious occasion of Navratri. In this campaign, 1023 Ayushman Bharat Cards and 91 Abha Cards have been issued in 22 Durga Mandals of Vani till 28th.
     यात (१) श्री. काळाराम दुर्गाउत्सव मंडळ रामपूरा वार्ड वणी, (२) श्री. नृसिंग दुर्गाउत्सव मंडळ नृसिंग व्यायाम शाळेचे मागे वणी, (३) रामपूरा दुर्गाउत्सव मंडळ तलाव रोड वणी, (४) राजकमल दुर्गाउत्सव मंडळ भगतसिंग चौक वणी, (५) जगदंबा दुर्गाउत्सव मंडळ शास्त्री नगर वणी, (६) सामुहिक दुर्गाउत्सव मंडळ एकता चौक मोक्षधामजवळ वणी, (७) नवनिर्माण दुर्गाउत्सव मंडळ शारदा सॉ मिल मागे वणी, (८) नवशक्ती दुर्गाउत्सव मंडळ एकरे किराणा दुकानजवळ वणी, (९) दुधगंगा दुर्गाउत्सव मंडळ गोकुळ नगर वणी, (१०) युवाशक्ती दुर्गाउत्सव मंडळ रंगनाथ नगर इदगाह जवळ वणी, (११) साई दुर्गाउत्सव मंडळ पशु रूग्णालयाच्या मागे वणी, (१२) शक्तीशाली महिला दुर्गाउत्सव मंडळ तानाजी नगर वणी, (१३) भाग्यशाली दुर्गाउत्सव मंडळ शाळा कं. ४ जवळ वणी, (१४) आनंदनगर दुर्गाउत्सव मंडळ आनंदनगर वणी, (१५) आदिशक्ती महिला दुर्गाउत्सव मंडळ निमोदिया नगर वणी, (१६) कनकवाडी दुर्गाउत्सव मंडळ मुंजे हॉस्पीटलचे मागे वणी, (१७) समर्थ मराठा दुर्गाउत्सव मंडळ मराठवाडा चौक वणी, (१८) नवरात्री दुर्गाउत्सव मंडळ इंदिरा चौक वणी, (१९) नवरात्र दुर्गाउत्सव मंडळ स्टेट बँक समोर वणी, (२०) सर्वशक्तीशाली दुर्गाउत्सव मंडळ भोईपूरा वणी, (२१) शितला माता मंदिर देवस्थान सुतारपुरा वणी, (२२) नवदुर्गा दुर्गाउत्सव मंडळ मालती अपार्टमेंट जैनस्थानक जवळ वणी. अशा एकुण २२ दुगर्गादेवी मंडळजवळ घेण्यात आलेला असुन त्यामध्ये आत्तापर्यंत १०२३ आयुष्यमान भारत कार्ड व ९१ आभा कार्ड काढण्यात आलेले आहे.


     तर दि. २९ रोजी (०१) माँ दुर्गा एकता मित्र मंडळ भिमनगर वणी, (०२) स्त्री शक्ती दुर्गाउत्सव महिला मंडळ रंगारीपूरा वणी, दि ३० रोजी (०१) नवदुर्गाउत्सव मंडळ तेली फैल वणी, (०२) महिला दुर्गाउत्सव मंडळ सिंधी कॉलनी वणी, (०३) नवयुवक दुर्गाउत्सव मंडळ सुभाषचंद्र बोस चौक वणी येथे घेण्यात येणार आहे तसेच दुर्गाउत्सव मंडळाच्या विनंतीनुसार काही ठिकाणी नियोजीत आहे.
     सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता भारतीय जनता वणी विधानसभेचे सर्व वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली वणी शहर मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, यवतमाळ जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष दिपक पाउणकर, शहर उपाध्यक्ष डॉ. रोहित वनकर, शहर सचिव राजु देवराव गव्हाणे, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी मारोतराव भेदोडकर, शहर सहकोषाध्यक्ष ललित कचवे, हर्षल बिडकर व त्यांची संपूर्ण टिम प्रयत्न करीत आहे.
      शिबीराचा वणीकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वणी शहर मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments