ADvt

वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज...



वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज... 

नियोजन बैठकीत उमेदवार निवडीचा आराखडा ठरला....

नगरसेवक पदासाठी इच्छुकानी १९ ते २३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

वणी :— सुरज चाटे 

     वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. शहर अध्यक्ष अ‍ॅड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागांमध्ये संघटन बळकटीसाठी प्रभाग प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाने थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती आखली आहे.


        In the backdrop of the Wani Nagar Parishad elections, the Bharatiya Janata Party has started preparations in earnest. Under the leadership of city president Adv. Nilesh Maya Mahadevrao Chaudhary, ward in-charges and co-in-charges have been appointed in all wards to strengthen the organization, and the party has planned a strategy to reach out directly to the voters.
      या अनुषंगाने दि. १८ ऑक्टोबर रोजी वसंत जिनिंग, वणी येथे सहविचार सभा व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत १०० महिला भगिनी आणि २५ पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून पक्षावर विश्वास व्यक्त केला. वरिष्ठ नेत्यांनी नव्या सदस्यांना पक्षाचा शेला देत स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


            कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष तारेंद्र भाऊ बोर्डे, वरिष्ठ नेते दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, माजी पंचायत समिती सभापती व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, कुणाल चोरडिया, जिल्हा सचिव संतोष डंभारे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, महादेव खाडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष पवन एकरे, सोशल मीडिया अध्यक्ष दीपक पाऊणकर, शहर मंडळातील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, तसेच आघाडी, सेल व युवा मोर्चा पदाधिकारी यांसह सुमारे ३५० च्या वर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
  बैठकीत मान्यवरांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढविणे, मतदारांशी संपर्क वाढविणे आणि भाजपाच्या धोरणांची जनजागृती करणे याबाबत मार्गदर्शन केले.
         यावेळी पक्षाकडून जाहीर करण्यात आले की नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक व्यक्तींनी १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत पक्ष कार्यालयात अर्ज दाखल करावेत, अशी सूचना देण्यात आली.
      या नियोजन बैठकीतून वणी भाजपने नगरपरिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून, पक्षाने "विकास आणि सुशासन" या घोषवाक्याने जनतेत उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

Post a Comment

0 Comments