अनैतिक संबंधाचा... बळी ठरला स्वप्निल....
युवकाची निर्घृण हत्या :- दोन आरोपींना अटक....
वणीत वाढती भाईगिरी चिंतेची घंटा....
वणी :– सुरज चाटे
वणी शहरात घडलेला खळबळजनक खून पोलिसांनी अवघ्या काही तासांत उकलला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या भाईगिरी करणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली असुन यामुळे सर्वसामान्यांत चिंतेची घंटा दिसत आहे.
The sensational murder that took place in Wani city was solved by the police in just a few hours. The investigation has revealed that the murder was committed due to an immoral relationship, and two accused have been arrested. There is a need to curb these nepotism and this is raising alarm bells among the general public.
२३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, २६ वर्षीय स्वप्नील किशोर राऊत (रा. रंगनाथनगर, वणी) याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पैसे आणायला सांगितले. घरातून बाहेर पडलेल्या स्वप्नीलचा रात्रीपर्यंत फोन बंद राहिला आणि तो घरी परतला नाही. कुटुंबीयांच्या शोधानंतर २४ ऑक्टोबर रोजी गजानन नगरी, वडगाव टीप रोड येथे त्याचा मृतदेह गळा व डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत आढळला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताबडतोब तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून, २३ ऑक्टोबर रोजी स्वप्नीलला लाल पॅशन प्रो दुचाकीवर दोन व्यक्तींसोबत ब्राम्हणी फाटा चौकातून टोलनाक्याकडे जाताना पाहिले गेले. या तपासादरम्यान आरोपींची ओळख पटली.
पोलीस तपासानुसार, या प्रकरणातील दोन आरोपी म्हणजे सुमेश रमेश टेकाम (२४) आणि सौरभ मारोती आत्रम (२७), दोघेही वडजापूर, ता. वणी, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहेत. चौकशीत आरोपींनी हत्या अनैतिक संबंधातून केली असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि जलद कारवाईत हे प्रकरण उकलले असून, पुढील तपास पोउपनि सुदाम आसोरे करत आहेत.










0 Comments