ADvt

कवडशी येथे देव दिपावली नवरात्र उत्सव...



नायगाव (बु.) येथे श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड, कवडशी येथे देव दिपावली नवरात्र उत्सव... 

विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी...

वणी :- 

     नायगाव (बु.), ता. वणी, जि. यवतमाळ येथील प्रसिध्द श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड, कवडशी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही देव दिपावली नवरात्र उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव दि. २१ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.
     या पवित्र नवरात्र उत्सवाची सुरुवात शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी मूर्तीस्थापना, सप्तशती पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज आरत्या, महिलांसाठी मंगळागौर, कीर्तन, भजन, नृत्यसंगीत तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना मिळणार आहे.
    उत्सवाचा प्रमुख सोहळा बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होईल. यावेळी सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुश्री चैताली विजयराज खटी (नागपूर) यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या दिवशी सकाळी ९ वाजता खंडोबा महाराजांच्या पालखीचे भव्य प्रस्थान होणार आहे.
    दैनिक कार्यक्रमात मूर्तीस्थापना, सप्तशती वाचन, महिलांसाठी मंगळागौर, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वाद्यवृंद, भक्तीगीत. दि. २६ रोजी महाप्रसाद या उत्सवाचे आयोजन श्री मल्हारी मार्तंड खंडोबा राया सेवा समिती, कवडशी, पुनवट यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments