राजु गव्हाणे यांची कन्या तेजस्विनीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी....
३४ विद्यार्थ्यांनी शिवराय चषक स्टेट लेवल स्पर्धेत पटकावली तब्बल ६८ पदके
वणीला मिळाला “सर्वाधिक पदकांचा” मान
वणी :- सुरज चाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 15 ते 16 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिवराय चषक सिलंबम महाराष्ट्र स्टेट लेवल चॅम्पियनशिप 2025 मध्ये वणीच्या शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व अशी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. स्टिक रोलिंग, वेपन रोलिंग, स्टिक फाईट, डबल स्टिक अशा विविध मर्दानी प्रकारात वणीच्या ३४ चिमुकल्या क्रीडा प्रेमींनी ३३ गोल्ड, २८ सिल्वर आणि ७ ब्राँझ असे एकूण ६८ पदके पटकावत राज्यस्तरावर वणीचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. या विक्रमी यशाने वणीला स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवणारा संघ हा बहुमान प्राप्त झाला.
⭐ तेजस्विनी गव्हाणे: तरुण पण दमदार नेतृत्व...
या संपूर्ण संघाचे मार्गदर्शन नेहमी जनसेवेत अग्रेसर असलेल्या राजु देवराव गव्हाणे यांनी केले असून प्रशिक्षणाची धुरा त्यांच्या कन्या, युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजु गव्हाणे हिने समर्थपणे सांभाळली.
तेजस्विनी ही सौ. मनिषा राजु गव्हाणे यांची कन्या असून महिला सक्षमीकरणासाठी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य त्या मनापासून करीत आहेत. शिव आनंद बहुउद्देशीय संस्था आणि रॉयल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक उपक्रम राबविताना तेजस्विनी व राजु गव्हाणे सह मित्र परिवार आघाडीवर असते.
🌟 तेजस्विनीचे स्वतःचेही द्विक पदक
अंडर-19 गटात तेजस्विनी गव्हाणेने 2 गोल्ड आणि प्रशिक्षक ट्रॉफी पटकावत स्वतःही उत्तुंग कामगिरी सादर केली.
🏅 पदकवीरांचा झंझावात — ३४ विद्यार्थ्यांची सुवर्ण लाट
अंडर-8 ते अंडर-19 गटातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीसह पदकांची बरसात केली. निवडक प्रमुख विजेते —
अंडर-8
1) श्रुती प्रवीण घोसरे – 2 गोल्ड
2) निवाण विजय गव्हाणे – 2 गोल्ड
अंडर-10
अवनी सचिन संदुरकर – 1 गोल्ड, 1 सिल्वर
अंडर-12
1) ओम संतोष धंदारे – 2 गोल्ड
2) दुष्यंत विजय गव्हाणे – 2 गोल्ड
3) खुशाल मडावी – 2 गोल्ड
3) नोक्ष किरण थाटे – 1 गोल्ड, 1 ब्राँझ
4) यश किरण थाटे – 2 सिल्वर
5) श्रावणी संदुरकर – 1 गोल्ड, 1 सिल्वर
6) भाविक असुटकर – 1 गोल्ड, 1 सिल्वर
7) आराध्य ठाकरे – 1 गोल्ड, 1 सिल्वर
8) गार्गी ठाकरे – 1 गोल्ड, 1 सिल्वर
9) यशिका आहुजा – 2 सिल्वर
अंडर-14
1) सेविका पराग गहुकर – 1 गोल्ड, 1 सिल्वर
2) कांचन गुरनुले – 1 गोल्ड, 1 सिल्वर
3) वैष्णवी सोनवणे – 1 गोल्ड, 1 सिल्वर
4) महेश्वरी गव्हाणे – 1 गोल्ड, 1 सिल्वर
5) देवयानी असुटकर – 1 गोल्ड, 1 ब्राँझ
6) मोक्षिता देठे – 2 गोल्ड
7) भूमिका किन्हेकर – 1 सिल्वर, 1 ब्राँझ
8) वैधेई गोहोकर – 1 गोल्ड, 1 सिल्वर
9) श्रावणी घोसरे – 2 सिल्वर
10) जिया हरणखेडे – 1 सिल्वर, 1 ब्राँझ
11) अक्षता सातपुते – 2 सिल्वर
12) ज्योती सहारे – 1 सिल्वर, 1 ब्राँझ
13) अक्षरा धंदारे – 2 गोल्ड
14) राजवीर ठाकरे – 2 सिल्वर
15) दक्ष यादव – 1 गोल्ड, 1 ब्राँझ
16) मानव ठाकरे – 1 गोल्ड, 1 सिल्वर
अंडर-17
1) आनंदी सातपुते – 1 गोल्ड, 1 ब्राँझ
2) खुशी सहारे – 2 सिल्वर
3) भाविक मत्ते – 2 सिल्वर
🎉 वणीचा मान उंचावणारी विक्रमी कामगिरी
एकाच स्पर्धेत ३४ विद्यार्थ्यांनी ६८ पदके पटकावणे ही खऱ्या अर्थाने इतिहासातील सुवर्णाक्षरात नोंदवावी अशी उपलब्धी आहे. या यशामुळे वणी शहराने राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात भक्कम अस्तित्व सिद्ध केले असून या चिमुकल्यांमुळे वणीचा नावलौकिक देशभर होण्यास मदत होणार आहे.
शिव आनंद बहुउद्देशीय संस्था, प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे आणि मार्गदर्शक राजु गव्हाणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ह्या यशाने वणीचा क्रीडा इतिहास नव्याने उजळून निघाल्याचे स्पष्ट दिसत आहे.










0 Comments