वणी नगर परिषद निवडणूक :- रंगनाथ नगर, खळबळा व गोकुळ नगर प्रभागात चुरशीची लढत…
भाजपचे निष्ठावंत दीपक मोरे अपक्ष म्हणून रिंगणात...
वणी :- सुरज चाटे
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीची तापट हवा दिवसेंदिवस वाढत असून रंगनाथ नगर, खळबळा आणि गोकुळ नगर परिसरातील राजकीय समीकरणांनी निवडणुकीची रंगत आणखीनच वाढवली आहे. स्थानिक पातळीवर नेहमीच सक्रिय राहून भाजपमध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम केलेले दीपक मारोती मोरे यांना पक्षाकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने प्रभाग १४-ब मधून अखेर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्धार केला आहे.
Deepak Maroti More, who has always been active at the local level and has worked loyally in the BJP for many years, has finally decided to run as an independent candidate from Ward 14-B after not getting the expected nomination from the party.
पक्षाच्या तिकीट जाहीरनाम्यानंतर या प्रभागात मोठी खळबळ उडाली असून मोरे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवर मोरे यांची जनसंपर्क शक्ती, समाजकार्यातील सक्रियता आणि वर्षानुवर्षे केलेली पक्षनिष्ठा लक्षात घेता त्यांच्या निर्णयाने प्रभागात निवडणुकीचा थरार चांगलाच वाढला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांच्या या पावलाकडे समर्थकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली असून ‘स्थानिकांना न्याय मिळावा’ यासाठी ते रिंगणात उतरल्याचे समर्थकांचे मत आहे. प्रभागातील मतदारांच्या मनाचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.








0 Comments