ADvt

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा..



ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा..

दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने वणी काँग्रेसमध्ये खळबळ

वणी :– सुरज चाटे

     पालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहरातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
     The Congress party has suffered a major setback as the municipal elections are in full swing. The sudden resignation of two important office bearers in the city has created a stir in local political circles.
    एकेकाळी जिल्ह्यात प्रसिद्ध लोकसभा निवडणूक उत्तमराव पाटील व सुरेश लोणकर या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे नेते सुरेश लोणकर यांच्याकडून गेले असताना वणी विधानसभेतून काँग्रेसचा गड राखणारे व वणी तालुक्यातून उत्तमराव पाटील यांना लीड घेऊन देणारे स्व. मदन अण्णाजी पुनियाला व अनेक वर्ष काँग्रेस मध्ये सक्रिय राहिलेले वणी शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेले स्व. सतिशबाबू तोटावार यांनी काँग्रेसला वणी सह परिसरात भक्कम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांचीच पत्नी व स्व. मदन अण्णा पुनियाला यांची मुलगी काँग्रेसच्या शहराध्यक्षा शामाताई सतिष तोटावार यांनी आरोग्य आणि कौटुंबिक कारणांचा उल्लेख करत पदाचा राजीनामा दिला. तर प्रमोद गोकुल लोणारे, जे २००६ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत आणि २०१९ पासून वणी शहर सेवादल अध्यक्ष पद भूषवत होते, त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर अचानक पदाचा राजीनामा सादर केला. प्रमोद लोणारे यांनी वणी पालिकेचे नगरसेवक पद भूषविले असून आरोग्य सभापती सुद्धा राहिलेले आहे. ते पहाड समाजाचे मागील अनेक वर्षापासून अध्यक्ष असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जगदंबा देवस्थानाचे ते सचिव देखील आहे. लोणारे नेहमी लोकांच्या सुख दुःखात सामील होत असतात. तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.  
      या दोन्ही राजीनाम्यांमुळे वणी पालिकेतील काँग्रेसची निवडणूकपूर्व समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील अंतर्गत वाद, जागावाटपात स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे—हीच या विस्फोटक राजीनाम्यांची मुख्य कारणे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
    ऐन वेळी दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा निरोप घेतल्याने काँग्रेस पक्ष काहीसा बॅकफूटवर जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आगामी पालिका निवडणुकीत याचा काँग्रेसच्या जनाधारावर काय परिणाम होतो, हे पहावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments