ADvt

वणीतील श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन...



वणीतील श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन...

•लेथ मशीणवाला म्हणून परिचित.

•उपचारादरम्यान वर्ध्यात प्राणज्योत मालवली.

वणी :- सुरज चाटे 

     वणी शहरात श्यामा (मिस्त्री) उर्फ श्यामा नरेश संगमवार (४०) रा.राजूर (कॉ),ता.वणी,जि- यवतमाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वणी शहरात लेथ मशीणवाले म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती. हसमुख स्वभाव, मदतीला तत्पर आणि सर्वांचे आपलेसे करणारा व्यक्तिमत्त्व अशा स्वरूपात त्यांची कायम ओळख होती.
     मागील ५ दिवसाआधी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना वर्धा येथील सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वर्धेवरून सकाळी पार्थिव शरीर 11 वाजेपर्यंत राजूर येथे पोहोचेल. दि. २५ ला राजुर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. कमवता व्यक्ती निघून गेल्याने परिवारावर संकट कोसळले आहे.
     त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.


Post a Comment

0 Comments