वणीत जनतेचा वाढता कौल… भाजपा साठी संजीवनी...
बिनविरोध विजयानंतर भाजपाची लाट अधिक मजबूत..
वणी :- राजु गव्हाणे
वणी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचत असताना विविध पक्षांत प्रचाराचा जोर वाढला आहे. मात्र, या सर्वांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मिळत असलेला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. प्रभागोपभागात भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना मिळणारी गर्दी आणि सकारात्मक चर्चा पाहता आगामी निवडणुकीत भाजपाला मजबुतीचा कौल मिळणार, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
It is being said in political circles that the BJP will get a strong vote in the upcoming elections, given the large crowd and positive discussions that have taken place at the meetings of BJP office bearers and workers in the constituency.
राज्यात भाजपाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत १०० हून अधिक नगरसेवक तसेच तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणत भारतीय जनता पक्षाचा जनाधार ठळकपणे सिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर वणीतील मतदारदेखील भाजपाच्या विकासाभिमुख भूमिकेकडे वेगाने आकृष्ट होत असल्याचे चित्र स्पष्टपणे उमटू लागले आहे.
वणीमध्ये भाजपाच्या प्रचारसभांना मिळणारी उसळलेली गर्दी, नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग, तसेच विकासकामांच्या भक्कम पायावर आधारित मांडणी यामुळे जनतेचा कौल भाजपाच्या दिशेने झुकत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. वाढता प्रतिसाद आगामी निवडणुकीत भाजपासाठी ‘संजीवनी’ ठरणार यात शंका उरत नाही, असा सूर स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.








0 Comments