ADvt

वणीत घरों-घरी मिळत आहे भाजपाला उत्साहवर्धक प्रतिसाद…



वणीत घरों-घरी मिळत आहे भाजपाला उत्साहवर्धक प्रतिसाद…

प्रचाराची रणधुमाळी सुरू : मतदारांच्या समस्या जाणून घेत उमेदवार घेत आहे आशिर्वाद...

सत्यभाषा वणी :- वणी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून प्रभाग क्रमांक १ ते १४ मध्ये उमेदवारांचे घरों-घरी जनसंपर्क सुरू आहे. मतदारांच्या दाराशी जाऊन आशीर्वाद मागण्याची चढाओढ दिसत आहे.


     विशेष म्हणजे, अनेक प्रभागांत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घरों-घरी उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मतदारांमध्ये भाजपाविषयी सकारात्मकता जाणवत असून विकासकामांवरील विश्वासामुळे पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.


     मात्र प्रतिस्पर्धी पक्षही मागे नाहीत. त्यांनी देखील आपला जनसंपर्क वेगात वाढवला असून अनेक प्रभागांत लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कडक तिरंगी लढतीचे संकेत मिळत असल्यामुळे निकालाच्या गणितात विविध शक्यता उभ्या राहत आहेत.



     एकूणच, वणीतील जनतेचा प्रतिसाद आणि उमेदवारांचा उत्साह पाहता प्रचाराचा जोरदार माहोल निर्माण झाला असून अंतिम टप्प्यातील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0 Comments