ADvt

वणी मध्ये महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा...



वणी मध्ये महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा... 

भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

सत्यभाषा वणी :– वणी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने आपली प्रचार मोहीम आणखी जोरदार करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत वणी येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


     ही सभा दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता, शासकीय मैदान, पाण्याची टाकी जवळ, वणी येथे होणार असून भाजपच्या विजयाचा बिगुल फुंकण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंत्री बावनकुळे हे आपल्या विकासाभिमुख कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे वणीसह संपूर्ण प्रदेशात विकासाची नवी दृष्टी मिळाली आहे. त्यामुळे या सभेला जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा व जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळणार यात शंका नाही.


    वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपच्या  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम या उमेदवार असून ‘कमळ’ चिन्हाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महिलांमध्ये आणि युवकांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. भाजपच्या मजबूत संघटनशक्तीमुळे ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास कार्यकर्त्यां कडून व्यक्त केला जात आहे.



    या सभेमुळे वणीतील राजकीय वातावरणाला वेग आला असून भाजपच्या विजयाची लाट आणखी बळकट होत आहे. विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वाच्या जोरावर भाजप पुन्हा एकदा वणी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवेल, असा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये व जनमाणसात दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments