ADvt

प्रभागा - प्रभागात भाजपची मजबूत पकड.. डोर टू डोर.. प्रचाराला वेग



प्रभागा - प्रभागात भाजपची मजबूत पकड.. डोर टू डोर.. प्रचाराला वेग 

घरों घरी भाजपा ची चर्चा.. आपलं मत विकासाला - विश्वासाला देण्याची उमेदवारांची विनंती...

कमळ चिन्हाकडे वाढता कल...


सत्यभाषा वणी :- वणी नगर परिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीला आता अधिक वेग आला असून, विविध प्रभागांमध्ये मतदारांचा उत्साह लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. स्थानिक प्रश्न, विकास कामांची अपेक्षा आणि आगामी पाच वर्षांचा विचार या मुद्द्यांच्या आधारे मतदार आपापल्या पसंतीची दिशा ठरवत आहेत.


     दरम्यान, वणीतील प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांबाबत सकारात्मक चर्चा होताना दिसत असल्याची माहिती स्थानिक राजकीय वर्तुळातून मिळत आहे. नागरिक आगामी काळातील विकास, पायाभूत सुविधा आणि स्थिर कारभाराच्या अपेक्षेने चर्चेत सहभागी होत असल्याचेही जाणवत आहे.


     निवडणुकीच्या गडबडीत एक वेगळीच गोष्ट लक्षात येत आहे — घरगुती चर्चांमध्ये चिमुकल्यांचाही आग्रह नजरेत भरतो आहे. जरी त्यांचे मतदान नसले तरी “आई-बाबा, आमच्या भविष्याचा विचार करा…” अशा विनोदी पण भावनिक भाषेत ते आपल्या पालकांना मतदानाबाबत मत व्यक्त करताना दिसतात. कुटुंबातील वातावरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील सहभागी भावनांना एक वेगळा रंग मिळत आहे. वणीतील सर्व प्रभागात वातावरण रंगत असून, प्रचाराची गती पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments