ADvt

“वर्धापन दिनी समाजसेवेचा आदर्श”.....



“वर्धापन दिनी समाजसेवेचा आदर्श”.....

गोदावरी अर्बन मल्टिस्टेटच्या वणी शाखेकडून बस स्थानक परिसरात सिमेंट बेंचेस लोकार्पण :- नागरिकांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध..

सत्यभाषा न्युज वणी :- सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणीचा ९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त वणी बस स्थानक परिसरात नागरिकांना बसण्याची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने सिमेंटचे बैठक बेंचेस लोकार्पण करण्यात आले.




     या सामाजिक उपक्रमामुळे प्रवासी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी एजीएम रवि इंगळे, माजी नगराध्यक्ष राकेशभाऊ खुराणा, वणी आगार प्रमुख लता मुळेवार, वाहतूक निरीक्षक जयश्री मेश्राम तसेच लेखाधिकारी कुंतीलालजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


     गोदावरी अर्बन, वणी शाखेने परिश्रमपूर्वक यशस्वी ९ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शाखेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ना. हेमंतभाऊ पाटील, अध्यक्षा सौ. राजश्रीताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सर्व संचालक, दवे मॅडम, विजय शिरमेवार तसेच सहाय्यक महाव्यवस्थापक रवि इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
     ए जी एम रवि इंगळे यांच्या विशेष उपस्थितीत आणि मार्गदर्शनात वणी बस स्थानक परिसरात सिमेंट बेंचेसचे लोकार्पण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
     यावेळी वणी शाखेचे व्यवस्थापक विजय मोडक, सुनील चिंचोळकर, सौ. प्रांजली ठाकरे, अक्षय अने, रवींद्र लोथे, अपर्णा केदार, विद्या निंबाळकर, अमोल देऊळकर, मंगेश करंडे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तसेच दैनिक आवर्ती ठेव अभिकर्ते, ठेवीदार, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments