ADvt

लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत....



लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत....

“नाट्यवेडा लोकशिक्षक” कार्यक्रमातून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा उलगडा...

वणी :- सुरज चाटे 

     लोककला, नाट्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांची विशेष मुलाखत येत्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणार आहे. “नाट्यवेडा लोकशिक्षक” या शीर्षकाखाली सादर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात त्यांच्या विविधांगी कार्याचा वेध घेण्यात आला आहे.
     बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डॉ. दिलीप अलोने यांची ही मुलाखत ख्यातनाम लेखक, सूत्रसंचालक तथा अभ्यासक डॉ. विवेक अलोनी यांनी घेतली आहे. त्यांच्या जीवनप्रवासातील कलात्मक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पैलूंवर प्रकाश टाकणारी ही मुलाखत रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्माती म्हणून नागपूर दूरदर्शनच्या मीनल पाठराखे यांनी कार्यभार सांभाळला आहे.
     प्रयोगशील शेतकरी, विद्यार्थीप्रिय शिक्षक, जादूगार, नकलाकार, नाट्यलेखक, अभिनेते आणि लोककलावंत अशा अनेक भूमिकांमधून डॉ. अलोने यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप उमटविली आहे. त्यांच्या समृद्ध आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा “मस्त कलंदर” हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत असून त्याचे संपादन डॉ. मनोहर सुरवाडे यांनी केले आहे.
     याशिवाय, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि लोकसंस्कृतीशी असलेल्या घट्ट नात्याचा गौरव करणारा “लोक रंगभूमी आणि लोक वाङ्मय” हा ग्रंथही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे डॉ. दिलीप अलोने यांच्या कार्याचा नव्याने परिचय करून देणारा हा दूरदर्शनवरील विशेष कार्यक्रम सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments