ADvt

नेरड पुरड सह तालुक्यात प्रसिद्ध असलेला मादगी राजाराम यांचे दुःखद निधन.. #rajaram

 


29 Jun, 2022

ImageImage

वणी :- राजु गव्हाणे

नेरड पुरड परिसरातील तसेच वणी तालुक्यातील प्रदिद्ध मादगी राजाराम येल्लना चाटे, रा नेरड (पुरड) यांचे दिनांक 29 जुन 2022 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

आपल्या चपला शिवण्याच्या व्यवसायाने संपूर्ण तालुका पिंजून काढणारा राजाराम ने अखेर जगाचा निरोप घेतला आहे, त्याच्या बोलण्याच्या उत्कृष्ठ शैलीने तो वणी सह परिसरात चांगलाच प्रसिद्ध झाला होता, राजाराम येल्लना चाटे, याचे दिनांक 29 जुन रोजी बुधवार ला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने त्यांचे राहते घरीच मु नेरड, ता वणी येथे दुःखद निधन झाले, त्यांचे मागे 1 मुलगी, जावई, पत्नी, भाऊ, नातवंड, व बराच मोठा आप्त परिवार असुन नेरड येथिल मोक्षधाम (स्मशानभूमी) येथे त्यांच्या पार्थिवावर दिनांक 29 ला दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


Image


वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

0 Comments