ADvt

'श्री रंगनाथस्वामी निवडणुकीत जय सहकारचा दणदणीत विजय......rangnath swami

 

'श्री रंगनाथस्वामी निवडणुकीत जय सहकारचा दणदणीत विजय......

27 Jun, 2022

ImageImage

जुनं ते सोनं :- ऍड देविदास काळे गटाचे वर्चस्व कायम.......

वणी :- सुरज चाटे

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणुक 26 जुन 2022 ला मतदान प्रक्रिया पार पडली तर दिनांक 27 ला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला त्यात परिवर्तन पॅनल वर जय सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, जय सहकार पॅनलला निवडून आणण्याकरिता पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते सतत मतदारांच्या संपर्कात असल्याने, जय सहकार पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ता पॅनेलच्या प्रचारार्थ डोअर टू डोअर फिरत होते, जय सहकार पॅनल ला मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने पुन्हा एकदा जय सहकार पॅनल चा झेंडा श्री रंगनाथस्वामी पतसंस्थेत रोवण्यात ऍड देविदास काळे गटाला मोठे यश आले आहे.

एका लहान वटवृक्षात रूपांतर झालेल्या तालुक्यात जिल्ह्यात नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 26 जुन 2022 रोजी पार पडली, या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल समोरा- समोर होते निवडणूक अटीतटीने रंगतदार झाली, पतसंस्थेची निवडणूक वणी तालुक्यांतील जनतेसाठी पतसंस्थेच्या सभासदांसाठी तसेच परिसराच्या विकासासाठी अतिशय महत्वाची होती पतसंस्थेत बदल घडविण्यासाठी जुनी खेळी रंगणार असल्याचे दिसून येत असल्याने मोठ्या प्रमाणात मतदार राज्याचा कौल काहीसा सहकाराच्या दिशेने होता मात्र अखेर निवडणूक म्हटलं की मतदार राजाचा कौल महत्वाचा तरी सुद्धा अल्प मतदानातही मतदारांनी आपली दिशा विकासात्मक ठेवत, जय सहकार ला विकासाच्या दिशेने नेत विजयाच्या उंबरठ्यावर नेलं असल्याचे दिसून आले.

श्री रंगनाथस्वामीच्या निवडणुकीत जुनं ते सोनं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण आजपर्यंत संस्था कुठल्या कुठून आणून त्याकरिता मेहनत लगण कसोटीचे प्रयत्न करून अखेर मतदार राजांनी सुदधा खरं सोनं ओळखून खरी पसंती जय सहकार पॅनल ला दर्शवली असून ऍड देवीदासजी काळे गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश आल्याचे दिसून येत आहे. सहकार क्षेत्रात जय सहकार ला मतदारांनी आपली पसंती दर्शवली असून, आम्हाला संस्थेत बदल नको आमचं जुनंच बरं असच काहीसं चित्र दिसून आलं आहे.


Image


वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

0 Comments