पूर ग्रस्त गावात मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप व पशुचिकित्सकासह पशु तपासणी व औषधोपचार उपक्रमाला सुरवात
22 Jul, 2022
एक हात मदतीचा :- *रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी, वणी डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना यांचा पुढाकार
वणी :- राजु गव्हाणे
सध्या उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकानेक समस्या उद्भवल्या असून विविध ठिकाणी पुरांचा फटका बसला आहे. काही गावांना पुराचा वेढा बसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता त्यातच त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते उपचार, पशु उपचार, खाण्या पिण्याच्या समस्या, जगण्यासाठी आदि समस्या समोर असताना अशीच एक हाक सहकार्याची म्हणून रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी, वणी डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना च्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त गावात डॉक्टर चमु तर्फे आरोग्य शिबिर, औषधि वाटप तसेच पशु चिकित्सक तर्फे पशु उपचार व औषधि वाटपाचा उपक्रम करण्याचे योजिले आहे.
परिस्थिती कोणतीही असो वनीकर मदतीकरिता नेहमी अग्रेसर असतोच, आता चक्क वणी विधानसभा परिसरात पुराचा मोठा फटका बसला असुन त्याकरिता मदतीची व सहकार्याची गरज असून शेतकरी, शेतमजूर अस्मानी संकटात सापडल्याने एक सामाजिक बांधिलकी जपत दिनांक 22 जुलै ते 25 जुलै 2022 या कालावधीत रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी, वणी डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना च्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त गावात डॉक्टर चमु तर्फे आरोग्य शिबिर, औषधि वाटप तसेच पशु चिकित्सक तर्फे पशु उपचार व औषधि वाटपाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात 22 जुलै 2022 - सकाळी 8 ते 11 - शेलू खुर्द , भुरकी , रांगना ,
दुपारी 3 ते 7 - झोला कोना, 23 जुलै 2022*
सकाळी 8 ते 11 - जुनाड़ा , पिपलगाव , उकनी ,
3 ते 7 - नायगांव , कवडसी , सावंगी , जूनि सावंगी, 24 जुलै 2022 सकाळी 8 ते 11 - चिंचोलि , जुनाड, दुपारी 3 ते 7 - मुंगोली , शिवनी, 25 जुलै 2022* (मारेगाव तालुका)
सकाळी 8 ते 11 - सावंगी , शिवनी धोबे ,
3 ते 7 - आपटी , वनोजा देवी असा उपक्रम असून याचा गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती कुठलीही असो वणीकर मदतीकरिता अग्रेसर.....आता गरज वणी तालुक्यालाच...
आपत्ती म्हटलं की केरळ, आसाम, काश्मीर, सोलापूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असो किंवा आणखी काही वणी कायम मदतीच्या कार्यात अग्रेसर असतोच मात्र आता वणी तालुक्यावरच पुराचे थैमान असून, अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे, गोरगरीब जनता घरात पाणी शिरल्या मुळे रस्त्यावर आली आहे, गाई ढुरे जागीच नष्ट झाली असून, वाहनांचे नुकसान झाले आहे आदी विविध समस्यांनी आता वणी तालुक्याला मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे मोठया प्रमाणात सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने या संकटमय परिस्थितीवर मात करण्याकरिता एकत्रित मदत करण्याचे आवाहन राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, डॉ महेंद्र लोढा, निकेश गुप्ता यांनी केले आहे.
0 Comments