ADvt

Sport News अंडर 19 फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्नवणी :- सुरज चाटे

न्यु ब्लॅक डायमंड फुटबॉल असोसिएशन वणीच्या वतीने 19 वर्षा आतील मुलांचे दिवस रात्र कालीन फाईव्ह ए साईड फुटबॉल टुर्नामेंट 17 व 18 जुलै ला जी.जी.एस.टर्फ ग्राऊंड छोरीया टाऊनशीप गणेशपूर वणीला संपन्न झाला आहे.

वणी,चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, घुग्गुस विविध ठिकाणांहून चमु या फुटबॉल टुर्नामेंट मध्ये सहभागी झाल्या
वणीतील उल्लेखनीय कार्य करणारे जेष्ट तसेच युवा पाहुण्यानी या टुर्नामेंट ला भेटी देऊन लाईनप करून शुभेच्छा ही दिल्या.
दिवस व रात्र कालीन फुटबॉल टुर्नामेंट अत्यंत चांगल्या प्रकारचे आयोजन, आयोजक कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.
या दोन दिवशीय फुटबॉल टुर्नामेंटच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. रवि बेलुरकर जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी याची उपस्थिती होती व तसेच वणीतील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते सत्तार खा पठान यांची ही उपस्थिती होती.श्री. राजुभाऊ जयस्वाल मे. रूक्मिणी टॅक्टर चे संचालक तथा स्वराज्य टॅक्टरचे अधिकृत विक्रेता व संध्याताई रामगीरवार संचालिका कुसुमाई बहुउद्देशीय संस्था वणी, सौ. सुमित्राताई गोडे शांतता कॅमिटी वणी येथील सदस्य, सौ. रेखाताई कार्लेकर महीला आघाडी सेना सचिव भारतिय जनता पार्टी याच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
या टुर्नामेंट च्या यशस्वीतेसाठी न्यु ब्लॅक डायमंड फुटबॉल असोसिएशन वणी चे हेमंत वाघमारे, ईकरम अली,रंजीत पचारे, यश नागतुरे, अक्षय करसे, पियुश पदलमवार, सहकारी सदस्य, खेळाडू वैभव आडे, चेतन गदाईकर, शिवम तुरानकर, अंकुश पारखी, अर्सलन अहेमद, पवन गदाईकर, पियूष पदलमवार, परिक्षीत पावडे
सूरज शेंडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन उत्कृष्टरित्या टुर्नामेंट यशस्वी करून दाखवील्याने आयोजकाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहेत.

Post a Comment

0 Comments