ADvt

वणी नगर पालिकेतील विविध कामांच्या निविदा जाहिरात मध्ये घोळ #Wani #Muncipal

 


15 Jul, 2022

ImageImage

वणी : सुरज चाटे

वणी नगर परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असुन आता निविदा जाहिरात मध्ये घोळ झाल्याने निविदा व कोंडवाडा लिलाव रद्द करण्याची मागणी होत आहे.

दि.६ जुलै २०२२ ला वणी नगर परिषदेच्या विविध विभागातील निविदा अनु.क्र.१,२ व ३ कामांची जाहिरात यवतमाळ येथिल एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्या दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ते दैनिक वणी शहरात येतच नाही.

तसेच एकाच प्रतिनिधी ला एकच जाहिरात दोन वेळा देण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका जाहिरात मध्ये ३००००/- तिस हजार रुपये कोंडवाडा लिलाव देकार रक्कम दाखविण्यात आली आहे. तर दुसऱ्या जाहिरात मध्ये फक्त ३ हजार रुपये दिसून येत असल्याने मोठा घोळ असल्याने दि.१४ व १५ जुलै रोजी काढण्यात आलेल्या निवीदा व कोंडवाडा लिलाव रद्द करण्याची मागणी दि.१२ जुलै ला जिल्हाधिकारी यवतमाळ, प्रशासक नगर परिषद वणी व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

उपमुख्यधिकारी खुषाल भोंगळे यांच्याकडे न.प.च्या विविध विभागाच्या विकास कामांची निविदा मागविण्यासाठी रोटेशन प्रमाणे विविध वृत्तपत्रात जाहिरात देण्याचे काम आहे. परंतु रोटेशन प्रमाणे जाहिरात न देता मोजक्या प्रतिनिधींनाच जाहिरातींचा लाभ मिळत असल्याच्या अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या असून, आता प्रत्यक्षात एका प्रकरणातुन दिसून आले आहे.

दि.१७ जुन २०२२ रोजी कर विभागातील एक जाहिरात एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. तिच जाहिरात आणि त्याच प्रतिनिधीला दि.६ जुलै २०२२ रोजी पुन्हा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दि.१७ जुन २०२२ च्या जाहिरात मध्ये कोंडवाडा लिलाव देकार रक्कम ३० हजार रुपये आहे. तर दि.६ जुलै २०२२ च्या जाहिरात मध्ये फक्त ३ हजार रुपये देकार रक्कम दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या वृत्त पत्रात (सांध्य दैनिक) मध्ये जाहिरात देण्यात आली ते वृत्त पत्र वणी शहरात येतच नाही.

एकीकडे रोस्टर प्रमाणे जाहिरात देण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एकाच प्रतिनिधी ला अनेकदा जाहिराती चा लाभ देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्टेशनरी ची जाहिरात परस्पर देण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे, याबाबत चौकशी केल्यास कामे सेटिंग होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येऊ शकतो.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून उप मुख्यधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, व त्यांच्या कडील जाहिरात वाटपाचे काम काढण्यात यावे, तसेच दि.१४ व १५ जुलै रोजी काढण्यात आलेल्या निवीदा व कोंडवाडा लिलाव रद्द करण्यात यावा, व रोटेशन प्रमाणे सर्व वृत पत्र्याच्या प्रतिनिधींना जाहिरात मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ, प्रशासक वणी नगर परिषद व मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Image


वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

0 Comments