ADvt

वाघाच्या हल्यात इसम गंभीर...वणी :- सुरज चाटे

     गेल्या काही दिवसात रांगणा भुरकी सह वणी तालुका परिसरात वाघाची दहशत सुरू असताना, वणी-नांदेपेरा बायपास रोड लगत असलेल्या नवकार नगरीत सुध्दा वाघाची दहशत असताना, दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी ब्राह्मणी गावाजवळ पहाटे 4 वाजताच्या दरम्यान एका इसमावर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून इसमाला वणी येथील लोढा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. 
     वाघ दिसल्याच्या मोठ्या घटना शिरपूर, निलजई, सुंदरनगर, तरोडा, लाठी बेसा, बेलोरा, उकणी, निवली, रांगणा भुरकी, नवकार नगर वणी, आदी कोळसा खान परिसरात घडत असून अजून पर्यंत या वाघांना पकडण्यात त्याच्यावर उपाययोजना करण्यात वन विभागाला यश आले नसून हा वाघ अजूनही आपला मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे.   दिनांक 24 ला पहाटे 4 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी गावाजवळ, असलेल्या KEC ट्रान्समिशन लाईन या कंपनीच्या तंबूत दोन इसम झोपलेले होते दरम्यान त्यापैकी उमेश पासवान वय 40 वर्ष हा युवक आपली सकाळची विधी करण्याकरिता कंपनीच्या तंबूच्या थोडा दूर गेला असता तो तो आपली सकाळची विधी करीत असतानाच त्याच्यावर बसून असतानाच वाघाने हल्ला चढविला. त्यातून त्याने आपला कसा बसा पळ काळीत आपल्या जीवाची सुटका केली व आपली धाव तंबूच्या दिशेने घेतली असता तंबूत आरडा ओरडा करीत उमेश पोहोचताच ''शेर ने हमला किया'' असे म्हणून जवळ येऊन पडला. त्याला पाहले असता त्याच्या मानेवर व उजव्या हातावर हल्ला केल्याचे लक्षात आले. तातडीने सहमित्राने त्याला ऑटोत टाकून लोढा हॉस्पिटल वणी येथे दाखल केले व उपचार सुरू केला दरम्यान वणी पोलीस विभाग व वन विभाग हे लोढा हॉस्पिटल वणी येथे दाखल होऊन त्याची पाहणी व विचारणा केली. 
     वाघाची दहशत सध्या वणी सह परिसरात असून वाघ शहराच्या वेशीवर पोहोचला आहे. तरी वनविभाग मात्र वाघाच्या पाऊल खुनाच शोधण्यात व्यस्त असुन अजूनतरी पाहिजे तशी उपाययोजना वनविभागाकडून दिसुन आली नसती तरी, नेमके परिसरात वाघ किती आहे? हाच प्रश्न असून, वाघाने आपला मोर्चा दुसऱ्या दिशेने वळविला असुन हा वाघ आक्रमक होण्याआधी वाघावर उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Post a Comment

0 Comments