ADvt

ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार आणखी एकदा चव्हाट्यावर?....



आदेश 100 चे आणि घेतात 150 :- वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्र फी मध्ये अफरातफर.....रवींद्र कांबळे

वणी :- सुरज चाटे

     वणी ग्रामीण रुग्णालय एक ना एक कारणावरून नेहमीच चर्चेत असतेच अशातच रुग्णालयात लागलेली पाटीवर वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र 100 असून मात्र 150 घेत असल्याने येथील समाजसेवक रवींद्र कांबळे यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांच्याकडे दिनांक 29.11.2022 रोजी निवेदनाद्वारे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे. 
     ग्रामीण रुग्णालय वणी मधून शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही खेळात सहभाग घेण्याकरीता तसेच वस्तीगृहात प्रवेश घेण्याकरीता वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्याकरीता ग्रामीण रुग्णालयामार्फत 150/- रू घेतले जातात. शासनाचे निर्णयानुसार फिटनेस प्रमाणपत्राकरीता 100/- रू. घेण्याचे आदेश आहे. तसेच 150/- रू. फी ही वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्राकरीता आहे. तसेच इतर प्रमाणपत्राकरीता 150/- रू. फी आहे. शालेय विद्यार्थी हे फिटनेस प्रमाणपत्र खेळाकरीता तसेच वस्तीगृहातील प्रवेशाकरीता घेतात. शालेय विद्यार्थी इतर कोणतेही प्रमाणपत्र मागत नाही.
     परंतु ग्रामीण रूग्णालय प्रशासन 50/- रू. ज्यादा घेवून विद्यार्थ्यांची लुट करीत आहे. तरी याची योग्य चौकशी करावी व ज्यादा घेतलेले पैसे विद्यार्थ्यांना परत देण्याचे आदेश द्यावे अशा मागणीचे निवेदन समाजसेवक रवींद्र कांबळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांच्याकडे दिनांक 29.11.2022 रोजी पाठवीत कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments