ADvt

Accident अरे बापरे...चक्क ओपन कास्ट कोळसा खाणीत अपघात....वणी :- सुरज चाटे

वणी नॉर्थ क्षेत्रातील जुनाळ ओपन कास्ट कोळसा खाणीत डोजर ने धडक देऊन 2 अंडर मॅनेजर गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 08 डिसेंबर 2022 ला दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
वणी नॉर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे.

      याच क्षेत्रात जुनाळ ओपन कास्ट कोळसा खान असुन खाणीत लेव्हलिंगचे काम सुरू असताना डोजर चढ भागातून येत असताना, तसेच ब्लास्टिंग होणार होती, त्यासाठी डोजर काढायला सांगितले होते, दरम्यान खाली उभ्या असलेल्या अंडर मॅनेजर च्या वाहनाला डोजर ची जोरदार धडक बसली ज्यात अंडर मॅनेजर वालदे व चवरे साहेब हे गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना तात्काळ भाल्लर येथील वेकोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आल्याची माहिती असून, डोजर चालकाचे डोजर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा कयास लावण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments