ADvt

कोलेरा येथील तो नरभक्षी वाघ पकडण्यात वनविभागाला यश




वणी :- सुरज चाटे

वणी तालुक्यातील नागरिक वाघाच्या दहशतीत वावरत असताना या परिसरात नेमके किती वाघ आहे याचा अजूनतरी नेम नसला तरी, कोलेरा पिंपरी क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाने कंबर कसली होती दरम्यान वनविभागाचा फौजफाटा क्षेत्रात दाखल होत अखेर त्या नरभक्षी वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्यात वनविभागाला दिनांक 7 डिसेंबर 2022 ला पहाटेच्या दरम्यान मोठे यश आले आहे. 


     वन विभागाने परिसरातील स्थिती बघता, वाघाला जेरबंद करण्याकरिता कोलेरा व पिंपरी परिसरात वनरक्षक कर्मचारी, ट्रॅप कॅमेरे, जागोजागी पिंजरे लावले. शोध मोहीम सुरु असतांना वाघ आढळताच वाघाला डॉट मारून बेशुद्ध करित आज बुधवारला सकाळी हा नरभक्षी वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने वन विभागाबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. 
     वणी तालुक्यात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांना सातत्याने वाघ दिसल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, अनेकांची जनावरं वाघाने फस्त केली होती. एवढेच नाही तर वाघ नरभक्षी झाला होता. त्याने दोन इसमाच्या शिकार केल्या, तर एका वर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. या वाघाच्या हल्ल्यात भुरकी येथील अभय देऊळकर (25) व कोलेरा येथील रामदास पिदूरकर (58) या दोघांचा नाहक बळी गेला. तर ब्राह्मणी येथे टॉवरचे काम करणारा उमेश पासवान या कामगारांवार हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या घटना व भीतीदायक वातावरण लक्षात घेत वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने शोध मोहीम राबवून मागील काही दिवसांपासून वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघाला अखेर कोलार (पिंपरी) कोळसा खाणीच्या सब स्टेशन जवळ जेरबंद करण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. त्याला गोरेवाडा नागपूर येथे रवानगी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र अजूनतरी वणी तालुक्यात किती वाघ आहे हे निश्चित नसून जो पर्यंत वाघाची दहशत आहे तोपर्यंत ही मोहीम राबविल्यास अजून काही वाघ आक्रमक होण्याआधी व कोणती अनुचित घटना घडण्याआधी वनविभागाला पकडण्यात यश येऊ शकते असे जनतेकडून बोलल्या जात आहे. 


Post a Comment

0 Comments