ADvt

महाराष्ट्र किसान सभेची तोफ विधानभवनावर धडकणार....




वणी :- सुरज चाटे

   महाराष्ट्र राज्य किसान सभेची शेतकरी, शेमजूर आदींच्या विविध मागण्या घेऊन नागपूर येथे  २६ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यातयेणार आहे यात वणी ते नागपूर पदयात्रा असणार असून २० डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ जाहीर सभा घेण्यात आली. 


     बुधवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता वणी वरून पदयात्रा सुरू होऊन रात्री वरोरा येथे जाहीर सभा व मुक्काम गुरुवार दि. २२ डिसेंबर रोजी न॑दोरी ( जि. वर्धा)  येथे मुक्काम शुक्रवार दि. २३ डिसेंबर  बरबटी ( वर्धा) येथे मुक्काम शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी बरबटी वरून पदयात्रा नागपूर जिल्ह्यात प्रवेश सोनेगाव लोधी येथे नास्ता- मोहगाव- कवठा ( दुपारचे जेवन) मा॑गली, दुधा- तारसी- ढवळपेठ - बुटीबोरी एम.आय.डी.सी. सुकळी शिवतीर्थ नगरी येथे मुक्काम 
     रविवार दि. २५ डिसेंबर  रोजी सकाळी ६ वाजता सुकळी वरून पदयात्रा बुटीबोरी मार्गे  सातगाव येथे नास्ता,  जामठा दुपारचे जेवन, नागपूर कडे खापरी- विमानतळ-रहाटे कॉलनी मार्गे दीक्षाभूमी वर मुक्काम 
सोमवार दि. २६ डिसेंबर २२ रोजी ११.३० वाजता दीक्षाभूमी वरून विधान सभेवर राज्याच्या २८ जिल्ह्यातुन  हजारो शेतकरी, शेतमजूर मोर्चात सामिल होणार असल्याची माहिती कॉ.अनिल घाटे यांनी दिली, तसेच या संघर्ष दिंडीत शेतकरी, शेतमजूर यांनी सामील व्हा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments