ADvt

कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर
(हिंगोली /प्रतिनिधी) :- सत्यभाषा डेस्क

      - राज्य सरकारी गड - ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने काल दिनांक 20 डिसेंबर 2022 रोज मंगळवार रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथील सभागृहामध्ये  कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची सभा यशस्वीपणे संपन्न झाली असून या बैठकीमध्ये आगामी 16 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाबाबत चर्चा होऊन, आंदोलन यशस्वी करण्याकरिता कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर, महासंघाचे राज्य सह कोषाध्यक्ष मा. श्री. रामदास शिराळे, महासंघाचे राज्य संघटक सचिव मा. श्री. रामभाऊ पांचाळ यांनी मार्गदर्शन केले असून सेवानिवृत्त /वैद्यकीय दृष्टया अपात्र होणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास पूर्वीप्रमाणे शासनसेवेत सामावून घ्यावे, अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट करावी व राज्यातील वारसाहक्काची सर्व पदे तात्काळ भरावीत, सन. 2005 नंतर शासनसेवेत रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व शासकीय कार्यालये /व रूग्णालयांमध्ये वर्ग -4 पदांवर ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेल्या तसेच कोरोना कालावधीत सेवा पुरविलेल्या बदली /अस्थायी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करावे व यापुढे ठेकेदारी पध्दत व वर्ग -4 सेवांचे खाजगीकरण बंद करावे अशा विविध प्रमुख मागण्या मान्यवरांनी मांडल्या, व कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे आगामी 'कर्मचारी टाइम्स' पेपर, पतसंस्था,महासंघ संघटना सभासद नोंदणी अशा विविध उपक्रमांची माहिती यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना दिली. 
     यानंतर कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा हिंगोली येथील नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, यामध्ये जिल्हाध्यक्ष - श्री. दिलीप भुक्तर, उपाध्यक्ष - श्री. एस. एस. डोंगरे, श्री. नितीन पांढरे, श्री. सदाशिव सोनोने, कार्याध्यक्ष - श्री. पि. एल. खंदारे, महिलाप्रमुख - श्रीमती. मथुराबाई दिडे, सचिव- श्री. गजानन चव्हाण, सहसचिव - श्री. कैलाश खंदारे, श्री. प्रभाकर खिल्लारे, सहसंघटक - श्री. हरिकिशन धनगर, प्रसिध्दी प्रमुख - श्री. प्रकाश मुकाडे, श्री. गंगाधर चेपूरवार, महिला प्रतिनिधी - श्रीमती. जमुनाबाई इसाई, कुमारी मोहूळे, श्रीमती. सुभद्राबाई ठोमरे, श्रीमती. कौशल्याबाई चेपूरवार, सभासद - श्री. आबेद शेख, श्री. व्ही. एच. मोरे आदिची निवड करण्यात आली असून, हिंगोली जिल्हा कर्मचारी महासंघाच्या नुतन कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासदाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर (राज्य उपाध्यक्ष) व प्रमुख अतिथी मा. श्री. रामदास शिराळे (राज्य सह कोषाध्यक्ष), मा. श्री. रामभाऊ पांचाळ (राज्य संघटक सचिव) आदि मान्यवरांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले असून, या बैठकीचे प्रास्ताविक श्री. गजानन चव्हाण, सूत्रसंचालन श्री. गंगाधर चेपूरवार,आभारप्रदर्शन श्री. हरिकिशन धनगर यांनी केले असून, अशाप्रकारे सभा यशस्वीपणे पार पाडली असुन, सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसुल विभाग, आरोग्य सेवा रूग्णालय, हिवताप विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, कृषी विभाग, पशुसंवर्धन आदि विविध विभागातील कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेतले असून, यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील महिलावर्ग, पुरूष कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments