ADvt

आंतरजिल्हा बॅटरी चोरणारी टोळी अखेर गजाआड




वणी :- सुरज चाटे
                   शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील कायर येथील ईन्डस कंपनीचे आयडीया व जिओ प्रोव्हायडर मोबाईल टॉवरच्या बॉटऱ्या चोरी करीत करित असल्याची गोपनीय माहीती ता.२५ डिसेंबर रोजी मध्यरात्री शिरपुर पोलीसांना गुप्त माहिती प्राप्त झाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड व सहकारी यानी कायर येथुन पिकअप या चार चाकी वाहणाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन, ४ लाख ४१ हजार ९०० रुपयाच्या मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेण्यास शिरपूर पोलिसांना यश आले.
          वणी तालुक्यातील कायर येथे इंडेक्स कंपनीचे आयडिया व जिओ मोबाईल सर्विस प्रोव्हायडर टॉवरच्या बॅटरी चोरी करीत असल्याची माहिती शिरपुर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स.पो. निरीक्षक गजानन करेवाड, विलास जाधव, अभिजीत कोषटवार यांनी कायर येथे पोहचत टॉवर मेंटेनन्स करणाऱ्यांची विचारपूस केली. बॅटरी चोरटे पिकअप वाहनाने गेले असल्याची माहिती मिळताच तात्काळ सरकारी वाहनाने पाठलाग करत रोडवरती नाकाबंदी केली असता लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकप गाडी (एम एच ३४ ए व्ही २०५९) वाहन दिसताच थांबवले असता वाहनाच्या डाल्यात कायर येथून चोरी केलेल्या इंडेक्स कंपनीच्या २४ बॅटऱ्या चोरीतील पिकअप वाहण असा एकुण ४ लाख ४१ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
          वाहनात बॅटरी चोरी करणारे मोहम्मद शाहीर मोहम्मद दाऊद शेख (३८), मोहम्मद युनूस रहिमदिन शेख (३०) दोन्ही राहणार राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारशा, तसेच शेख आसिफ शेख सुबान(२२) रा.मौलाना आझाद वार्ड बल्लारशा,जी.चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन आरोपींवर भादवी ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, मा.पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड (ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर), पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, विलास जाधव, अभिजीत कोशटवार, गजानन सावसाकडे ,घोडाम, पो.कॉन्स्टेबल राजन ईसनकर यांनी केली

Post a Comment

0 Comments