ADvt

मी सुध्दा तुमच्या प्रमाणे एक अपंगच..... राकेश खुराणाअन अश्रु झाले अनावर :- अपंग विद्यार्थ्यांसह वाढदिवस साजरा...

वणी :- राजु गव्हाणे
     दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री राकेश ओमप्रकाशजी खुराणा यांनी आपला जन्मदिवस अपंग निवासी कर्मशाळा वणी येथे अपंग विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात नियमित उपयोगात येणाऱ्या थर्मल पाणी बॉटल व खाऊंचे वाटप करून आगळा वेगळा जन्मदिवस साजरा केला, दरम्यान उपस्थित मान्यवरांसमोर त्यांनी सांगितले की मी सुध्दा एक अपंग आहे असे म्हणत त्यांना अश्रु अनावर झाले. 
     जन्मदिवस म्हटलं की पैशाची उधळण पार्ट्या नाच गाणे या गोष्टी काही दूर जात नाही मात्र वणीचे माजी नगराध्यक्ष, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष, पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष तसेच क्रांती युवा संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष मा राकेश ओमप्रकाशजी खुराणा यांनी आपला जन्मदिवस कोणताही गाजा वाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने गोरगरिबांच्या मदतीच्या दृष्टिकोनातून विचार करीत वणीतीलच अपंग निवासी कर्मशाळा वागधरा/वणी येथे अपंग विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात नियमित उपयोगात येणाऱ्या थर्मल पाणी बॉटल व खाऊंचे वाटप वाटप करून साजरा केला त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी सुद्धा एक अपंगच असुन खचुन न जाता आपण आपल्या कर्माने व मेहनतीने मोठे होत असतो आपल्याला अपंगत्व आहे म्हणून खचुन न जाता आपल्यात जिद्द चिकाटी जर असेल तर कुठलेही यशाचे शिखर गाठण्यास अशक्य नाही हे बोलतांना त्यांनी सांगितले की त्यांनासुद्धा लहानपणी अपंगत्वा मुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला यावेळी त्यांचे हृदय दाटून आले व त्यांना अश्रु अनावर झाले. तसेच राकेश भाऊ खुराणा यांनी सांगितले की अपंग निवासी शाळेला कुठलीही अडचण आल्यास काही मदतीची गरज पडल्यास मी व माझी संगटना नेहमी गोरगरीबांसोबत आहे, विद्यार्थ्यांनी व अपंग शाळेने सुद्धा भाऊंना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. 
     यावेळी निवासी अपंग कर्मशाळेचे शिक्षाकेत्तर कर्मचारी, क्रांती युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश दि भुजबलराव, निलेश कटारिया, लवलेश लाल, राजु गव्हाणे, ऍड सुरज महारतळे, कपिल जुनेजा, प्रमोद लोणारे, शिवेंद्र ब्राम्हणकर, ब्रिजेश निंदेकर, लोकेश गुंडलवार, दिपक मोरे, पुरुषोत्तम नवघरे, अजय बजाईत, नागो आतमंगल, सतीश गेडाम, प्रमोद देठे, जमीर शेख, राहुल गेडाम, सईद भाई, मारोती खडतकर, आसुटकर सर, श्याम ठाकरे, विजु गव्हाणे, सुरज चाटे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments