ADvt

व्हॉइस ऑफ डिजिटल मिडिया" पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर
★राजू निमसटकर अध्यक्ष, उपाध्यक्ष राजू तुराणकर तर सचिवपदी अजय कंडेवार.

★वणी उपविभागात एकमेव डिजिटल मिडिया संघटना.

वणी:- सुरज चाटे
     उपविभागातील एकमेव "व्हॉइस ऑफ डिजिटल मिडिया"  पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी काल दि.11 जाने 2023 शासकीय विश्राम गृह,वणी येथे गठीत करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी राजू निमसटकर,सचिवपदी अजय कंडेवार ,उपाध्यक्ष राजू तुराणकर ,सहसचिव प्रशांत चंदनखेडे कोषाध्यक्ष रमेश तांबे यांची निवड करण्यात आली.


सध्याच्या काळात पत्रकारितेला सकारात्मकतेची किनार असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी पत्रकारितेने एक नवीन दृष्टी ठेवून काम करणे सध्या गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून "व्हाईस ऑफ डिजिटल मीडिया" ही पत्रकारांची संघटना एक नवा विचार घेऊन पुढे येत आहे. ही संघटना येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आणि गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज व्हावा व अन्यायाविरुद्ध ठेचून काम करण्याची जिद्द घेऊन समोर येत आहे आणि पीडितांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न हा संघटनेच्या राहील. त्यातच पत्रकारांच्या अनेक संघटना गठीत झाल्या. त्यानंतर पत्रकारांच्या चार पिढ्या गेल्या परंतु अनेक संघटनेत संघटनात्मक पातळीवर ठोस असे काम झाले नाही. आमची ही संघटना जनतेचा हक्काव्यतिरिक्त पत्रकारबंधुसाठी त्यांचे आरोग्य, घर, कुटुंब सुरक्षितता आणि संरक्षण ही पंच सूत्री घेऊन ही संघटना पुढे काम करणार आहे. संघटना पत्रकारांच्या पुढच्या पिढीला दिशा देण्याचे काम करेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. माणसाची उपयोगिता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आगामी काळात "व्हाईस ऑफ डिजिटल मीडियाच्या" वतीने गोरगरीब, दुर्बल व दुर्लक्षित घटकांचा आवाज ही संघटना होईल असे मत राजू निमसटकर यांनी व्यक्त केले.
     यावेळी विश्राम गृहात कार्यकारिणीची बैठक राजू निमसटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या कार्यकारणीत राजू निमसटकर (अध्यक्ष),राजू तुराणकर(उपाध्यक्ष),अजय कंडेवार (सचिव) प्रशांत चंदनखेडे (सहसचिव),रमेश तांबे (कोषाध्यक्ष),संतोष पेंदोर(संघटक),ऍड.दिलीप परचाके ( सल्लागार),निकेश झिलठे (सदस्य),सुनील इंदूवामन ठाकरे(सदस्य),देव येवले (सदस्य),प्रशांत जुमनाके(सदस्य) संतोष बहादूरे(सदस्य),आनंद नक्षणे (सदस्य) या सर्वांची बिनविरोध निवड करीत एक नवीन अन्यायाला वाचा फोडणारी कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
    तसेच याचवेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments