ADvt

त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्यक्त केली दिलगिरीशाळेच्या विद्यार्थ्यांना तेलगु भाषिक कॅलेंडर वाटप केल्यामुळे मनसे आक्रमक...

स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेतील प्रकार

वणी :- सत्यभाषा न्युज

     वणी - नांदेपेरा मार्गावरील स्थित असलेली स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेने 2023 चे कॅलेंडर हे तेलगु भाषेत छापल्यामुळे तसेच वणीतील विद्यार्थ्यांना ते वाटप करण्यात आले त्यामुळे मनसे कार्यालयात काही पालकांच्या तक्रारी आल्या यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, लक्की सोमकुवर यांच्या सह कार्यकर्त्यांनी शाळेत भेट देत महाराष्ट्रात मराठीला कोणी हात लवाचा प्रयत्न करू नये असा इशारा देत मनसे ने शांतप्रिय पने आपली बाजु मांडली त्यामुळे दिनांक 11 जानेवारी 2023 ला शाळेने सुद्धा तसा माफीनामा लिहून दिला आहे.


     वणी - नांदेपेरा या मार्गावर स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल असून याचे स्ट्रकचर हे आंध्रप्रदेशातील असुन त्यांनी वणी येथे सुद्धा त्यांच्या सदर शाळेत तेलगु भाषेत कॅलेंडर विद्यार्थ्यांना वाटप केल्यावरून दिनांक 11 जानेवारी 2023 ला काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात तक्रार केल्याने मनसे वणी तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांच्या उपस्थितीत स्वर्णलीला शाळेत कार्यकर्ते दाखल झाले असता त्यांनी आपली बाजु मांडली व त्यांना सांगितले की महाराष्ट्रात तेलगु भाषिक कॅलेंडर वाटले कसे? यावरून स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेने तसा माफीनामा दिला असून त्यांनी त्यात म्हटले की, आमची स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुल वणी येथे स्थीत असून आमच्या शाळेत शिकणा-या विदयार्थ्याना 2023 चे तेलगू भाषेतील दिनदर्शिकचे वाटप केले त्या दिनदर्शिक मध्ये आमच्या इतर शाखेची माहीती मिळावी हाच आमचा उद्देश होना परंतू ती दिनदर्शिका मराठीत नसल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो - यानंतर अशी धुक आमच्या कइन होणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्राच्या जनतेला व पालकांना देतो असा माफीनामा मुख्याध्यापिका यांनी दिला आहे. 
     यावेळी मनसेचे फाल्गुन गोहोकार तालूकाध्यक्ष ,शिवराज पेचे ,शहर अध्यक्ष लककी सोमकुंवर रुग्णसेवा उपाध्यक्ष , सुरज काकडे पवन दुर्ग .महेश कायतवार. श्रीकांत नुगुरवर. सूरज गुम्मुलावर. निखिल जांगीलवर. कपिल मेश्राम. साबीर शेख. बंडू चिकराम. कार्तिक अलचेवर. शुभम बासावार. अखिल नगरकर जीवन गुममुलावर. सनी बिस्वास. गजानन कोडपे. पवन राजूरकर निखिल सुरपम. बाळू पेंदोर. इर्शाद शेख. शिवम टेकाम. विनोद सुरापाम. राहुल सर्वरे. अशोक शर्लावार उपस्थित होते. 
     

Post a Comment

0 Comments