ADvt

रंगनाथ नगर येथील ठेकेदारा सहित मजुराला जीवाने मारण्याची धमकीचक्क ठेके घेण्याच्या कारणावरून वाद :- दोन गटात राडा, घरी येऊन दिली धमकी, झाले होते तणावाचे वातावरण

वणी :- सुरज चाटे

     वणी येथील रंगनाथ नगर परिसरात ठेके घेण्याचे वादावरून दोन गटात राडा झाल्याने चक्क ठेकेदाराच्या घरी येऊन सेवा नगर येथील काही युवकांनी येऊन त्याला धमकी देत त्याच्या सहकार्याला मारहान केल्याची घटना दिनांक 17 ला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 
     राहुल ज्योतीराम किनाके वय 27 वर्ष रा. खराबळा मोहला, वणी, ता. वणी, जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिल्यावरून, राहुल हा वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो व ज्ञानेश्वर दुधलकर यांचेकडे मजुरीने तो काम करतो, दिनांक 17/01/2023 रोजी सायंकाळी 19/00 वा. चे सुमारास राहुल व बांधकाम ठेकेदार ज्ञानेश्वर दुधलकर यांचे सोबत चौपाटी बार परीसरात फिरत असताना बांधकाम ठेकेदार नामे संजु संपूर्ण नाव माहीत नाही. यांचे सोबत ज्ञानेश्वर दुधलकर यांचा बांधकाम ठेके घेण्याचे कारणावरुन वाद झाला. त्यानंतर मी व माझे ठेकेदार हे दुधलकर यांच्या घरी गेलो व त्यांचे घरी बसून असतांना रात्री अंदाजे 09/30 वा. चे सुमारास माझे ठेकेदार दुधलकर याचे रंगनाथनगर येथे घरा समोर संजु ठेकेदार वय 32 वर्ष रा छत्तीसगढ ह मु कोंढणावाडी, व सोबत सेवानगर वणी येथील दोन इसम आले त्यांचे मला नाव माहीत नाही. त्यांनी माझी कॉलर पकडुन माझे नाकावर  भारहान केली त्यामुळे माझे नाकाला लागले आहे. तसेच मला व माझे ठेकेदार नामे ज्ञानेश्वर दुधलकर यांचे अंगावर चालून जावून त्यांची कॉलर पकडली तसेच त्यांना व मला एखादे दिवशी जिवाने मारण्याची धमकी दिली. याचेवर कार्यवाही होणे करीता राहुल व त्याचा सोबत ठेकेदार नामे ज्ञानेश्वर दुधलकर यांचे सह पोलीस स्टेशनला हजर रिपोर्ट दिला आहे. 
     काही वेळाकरिता तणावाची स्थिती निर्माण झाली होती दरम्यान वेळीच वणी पोलीसांची चमू दाखल झाली व त्यांनी घटनेचे गांभीर्य समजत जमलेल्या जमावाला शांत केले, जर वणी पोलीस वेळीच पोहोचली नसती तर मोठी घटना होण्यास वेळ लागला नसता पुढील कारवाई वणी पोलीस करीत आहे. 

Post a Comment

0 Comments